Shiv Sena : भाजपत धुसफूस! शिवसेनेने नाराजी दूर करण्यासाठी जाहिरातीत काय केला बदल?
एकनाथ शिंदें यांच्या एका जाहिरातीमुळे राजकारण रंगलेलं असताना पुन्हा एक नवीन जाहिरात देण्यात आली असून या जाहिरातीमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT
‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रामध्ये शिंदे’ या जाहिरातीने भाजप-शिवसेना युतीत ठिणगी पडली. भाजपमधून नाराजीचा सूर उमटला आणि पडद्यामागेही बऱ्याच घटना घडल्या. पण, या जाहिरातीमुळे भाजपमधून उमटलेल्या नाराजीच्या सूराचं ‘डॅमेज कंट्रोल’ नव्या जाहिरातून करण्यात आलं.