सचिन वाझेंच्या अटकेनंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया..
अँटेलिया कार प्रकरणी API सचिन वाझेंना काल NIA कडून अटक करण्यात आली. त्यानंतर आज पहाटे साडे तीन वाजता एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार एनआयएच्या हाती लागली आहे. त्यामुळे आता सचिन वाझे यांची अटक आणि इनोव्हा कारचा नेमका संबंध काय? अशी चर्चा रंगू लागली आहे. 25 फेब्रुवारी 2021 रोजी मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाच्या बाहेर एक […]

ADVERTISEMENT
अँटेलिया कार प्रकरणी API सचिन वाझेंना काल NIA कडून अटक करण्यात आली. त्यानंतर आज पहाटे साडे तीन वाजता एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार एनआयएच्या हाती लागली आहे. त्यामुळे आता सचिन वाझे यांची अटक आणि इनोव्हा कारचा नेमका संबंध काय? अशी चर्चा रंगू लागली आहे. 25 फेब्रुवारी 2021 रोजी मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाच्या बाहेर एक स्कॉर्पिओ कार उभी करण्यात आली होती. ज्यामध्ये जिलेटीन कांड्या आणि अंबानींच्या नावे धमकीचं पत्र मिळालं होतं. जेव्हा पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणाचा तपास केला तेव्हा त्यांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्कॉर्पिओ कार पार्क केल्यानंतर त्या कारमधील संशयित व्यक्ती ही मागेच असणाऱ्या एका दुसऱ्या इनोव्हा कारमध्ये बसून निघून गेल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर याप्रकरणी आता अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.