Virar Crime : क्लासेसमध्ये मुलीचा लैंगिक छळ, पालकांना कळताच शिक्षकाला चोप चोप चोपलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

वसई-विरार मधील एका कोचिंग क्लासमध्ये शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर पालकांनी त्याला चोप दिला, ज्यामुळे परिसरात संताप उफाळला आहे.

social share
google news

Virar Crime News : मुंबईच्या वसई-विरार मधील मनवेल पाड्यातील एका कोचिंग क्लासमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्यानंतर पालक आणि स्थानिकांनी संतापाच्या भावना व्यक्त करत आरोपी शिक्षकाला घटनास्थळी चोप देतानाची दृश्यं समोर आली आहेत. पालकांच्या रोषाच्या भरात शिक्षकाला बेदम मारहाण करण्यात आली, त्याचे कपडे फाडण्यात आले आणि त्याला रस्त्यावर ओढून नेण्यात आले

ADVERTISEMENT

. या दुर्दैवी घटनेमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड संताप उफाळला असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी ते करत आहेत. या घटनेने वसई-विरार परिसरात खळबळ माजली आहे आणि पोलीस तपास करत आहेत. स्थानिकांच्या आक्रमक प्रतिक्रियेमुळे ही घटना चर्चेचा विषय बनली आहे आणि मनुष्यमानवतेला काळिमा आहे.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT