लिफ्ट देण्याच्या बहाण्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार, तिघांच्या आवळल्या मुसक्या
crime news : परीक्षेवरून घरी परतत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीला दुचाकीवरून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त समोर आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कारवाई करत पोलिसांचे छापे
पीडितेच्या कुटुंबीयांना धमक्या
Crime News : बिहारच्या दरभंगा जिल्ह्यात बिरोली ठाणे क्षेत्रात एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला. परीक्षेवरून घरी परतत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीला दुचाकीवरून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मुख्य आरोपी प्रविंद्र मांझी नावाचा तरुण ननिहाल परिसरात गेला होता. संबंधित प्रकरणात आरोप करण्यात आला की, विद्यार्थिनीला एका रात्री ओलीस ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आहे. या घटनेनंतर पीडित कुटुंबीयांनी 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
हे ही वाचा : पुण्यातील विश्रांतवाडीत 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, 52 वर्षीय सफाई कंत्राटी कामगाराला अटक
कारवाई करत पोलिसांचे छापे
पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असता, नंतर बिरौल पोलिसांनी देखील घटनेची तत्परतेने कारवाई करत संभाव्य लपण्याच्या ठिकाणांवर छापे टाकले आणि मुख्य आरोपी प्रवीणद्र मांझी, त्यांचे वडील जामुन मांझी आणि गुन्ह्यात मदत करणाऱ्या आणखी एका साथीदाराला अटक करण्यात आली.
पीडितेच्या कुटुंबीयांना धमक्या
पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, जेव्हा मुख्य आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा त्याचा वडील, जामुन मांझी, पोलिसांसमोर पीडितेच्या कुटुंबीयांना धमक्या देऊ लागला आणि त्यांना खोट्या गुन्ह्यात गोवू लागला होता. त्यामुळे त्यालाही घटनास्थळी अटक करण्यात आली होती.
हे ही वाचा : स्नॅपचॅटवर ओळख ते हॉटेलवर नेऊन बलात्कार, 12 वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत काय घडलं?
पोलिसांना सांगितलं की, पीडितेला वैद्यकीय तपासणी सुरू केली असून तिचा जबाब न्यायालयात नोंदवला जाणार आहे. संबंधित घटनेची परिस्थिती, न्यावैद्यक पुरावे आणि कुटुंबीयांच्या आरोपांच्या आधारे, पुढील कठोर कायदेशीर कारवाई केली जाते.
