स्नॅपचॅटवर ओळख ते हॉटेलवर नेऊन बलात्कार, 12 वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत काय घडलं?
आधी स्नॅपचॅटवर ओळख झाली. हळहळू बोलणं वाढलं. मग त्यानं बारावीत शिकणाऱ्या मुलीला बोलावून घेतल. घरात खोटं कारण सांगून ती गेली. पण तिच्यासोबत पुढं काय होणार आहे, याची पुसटशीही कल्पना तिला नव्हती. ग्वाल्हेरमध्ये नेमकं काय घडलं, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
स्नॅपचॅटवर ओळख ते हॉटेलवर नेऊन बलात्कार
12 वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत काय घडलं?
Crime News : स्नॅपचॅट या सोशल मीडिया ॲपवरून झालेली मैत्री एका अल्पवयीन विद्यार्थिनीसाठी भयंकर ठरली आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने मुलीच्या वडिलांना जीवे मारण्याची आणि तिचे आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन हे कृत्य केले. या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त होत असून पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे.
ओळख, प्रेम अन् घात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनीची सुमारे एका वर्षापूर्वी कृष्णा खटवाणी नावाच्या तरुणाशी स्नॅपचॅटवर ओळख झाली होती. हळूहळू त्यांच्यात चॅटिंग आणि फोनवरून बोलणे वाढले. 22 सप्टेंबरच्या संध्याकाळी आरोपीने तिला भेटण्यासाठी बोलावले. मुलीने घरी कोचिंग क्लासला जात असल्याचे सांगितले आणि ती 5.15 च्या सुमारास घराबाहेर पडली. मात्र ती क्लासला न जाता आरोपीला भेटायला गेली, जिथून आरोपीने तिला जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये नेले.
हे ही वाचा : विवाहित महिलेचा चुलत भावावर जडला जीव, पण संसार थाटण्याचं स्वप्न जळून खाक!
हॉटेलमध्ये काय घडलं?
हॉटेलच्या खोलीत मुलीने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची तसेच तिच्या वडिलांना दुखापत करण्याची धमकी देत त्याने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर अत्यंत घाबरलेली ही मुलगी घरी परतली आणि तिने घडलेला सर्व प्रकार कुटुंबाला सांगितला. सुरुवातीला सामाजिक बदनामीच्या भीतीने कुटुंबीयांनी पोलिसांत जाण्याचे टाळले; मात्र अखेर धैर्य दाखवून त्यांनी 24 सप्टेंबर रोजी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली.
हे ही वाचा : आत्महत्या करू नये म्हणून पोरगा वडिलांना सोडेना, आदित्य ठाकरेंची पाच हजारांची मदत
आरोपी फरार
या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी कृष्णा खटवाणीविरोधात लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) कायदा तसेच बलात्काराच्या संबंधित कलमांखाली एफआयआर दाखल केला आहे. पोलीस सध्या हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी करत असून आरोपीच्या संभाव्य ठिकाणांवर छापे टाकत आहेत. फरार आरोपीचा शोध घेऊन त्याला लवकरात लवकर अटक करण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
