बदलापूर प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरमधील महत्वाचे मुद्दे
राज्यात चर्चेत असलेल्या बदलापूर प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाला आहे. हायकोर्टाने या प्रकरणी 10 मुद्दे तपासले.

ADVERTISEMENT
सध्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात चर्चेत असलेल्या बदलापूर प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाला आहे. हा एन्काऊंटर झाल्यानंतर विरोधी पक्षांकडून आरोप करण्यात येत आहेत की हा एन्काऊंटर सत्ता धारकांच्या सांगण्यावरून झाला आहे. अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनीही दावा केला आहे की त्यांचा मुलगा फटका फोडायला घाबरायचा, तो बंदूक कसा चालवेल. आज हायकोर्टात या प्रकरणी तातडीची सुनावणी झाली ज्यात हायकोर्टाने सरकार आणि पोलिसांवर कडक शब्दात टीका केली. हायकोर्टाने या एन्काऊटर प्रकरणाच्या 10 महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे. या मुद्द्यांच्या तपशीलांसाठी व्हिडिओ पाहा व संपूर्ण माहिती मिळवा.