एग्जिट पोल

बारामती हत्या: बाईकने कट मारला, बॅगमध्ये आणलेल्या चाकूने वर्गमित्राला संपवलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

बारामतीत १२ वी च्या विद्यार्थ्याची बाईकचा कट मारल्याने हत्या करण्यात आली आहे. अल्पवयीन आरोपीला अटक.

social share
google news

बारामती: पुण्यातील अनेक ठिकाणी कोयगा गँगकडून नागरिकांवर हल्ले होत असल्याच्या घटना ताज्या असतानाच, आता बारामतीतून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. १२ वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याची चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे. बाईकने कट मारल्याच्या रागातून वर्गातीलच मित्राने या विद्यार्थ्याची हत्या केली. घटनेनंतर बारामती पोलिसांनी तातडीने कारवाई करत अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे आणि अन्य फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे. गेल्या काही महिन्यामध्ये अशा घटना वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT