महाराष्ट्रात अवकाळी पावसानं थैमान घातलं. यात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. मंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी केली. यावेळी छगन भुजबळ यांच्या दौऱ्याला मराठा आंदोलकांनी विरोध केला. भुजबळांच्या ताफ्य़ाला यावेळी काळे झेंडे दाखवण्यात आले.