Dombivali : 'हा' Video पाहून फळ खाणं सोडून द्याल, फळ विक्रेत्याचं किळसवाणं कृत्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

Dombivali Viral Video : डोंबिवलीत फळविक्रेत्याने प्लास्टिकच्या पिशवीत लघुशंका केली आणि त्याच हाताने फळविक्री केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

social share
google news

Dombivali Viral Video :  डोंबिवलीतून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही फळ खाणे सोडून द्याल.त्याचं झालं असं की, डोंबिवलीत एका फळविक्रेत्याने पिशवीत लघूशंका केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर त्याने त्याच हाताने फळविक्री केल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेने नागरीकांना मोठा झटका बसला आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

फळविक्रेत्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि पुढील कार्यवाही सुरू केली आहे. तसेच फळ विक्रेत्याच्या या घाणेरड्या कृत्यानंतर डोंबिवलीतील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेने परिसरातील स्वच्छता आणि अन्न सुरक्षा विषयक चिंता निर्माण केली आहे. संबंधित विभागाने त्वरित कारवाई करून अशा प्रकारच्या घटना टाळाव्यात असे नागरिकांनी मागणी केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT