गुलाब चक्रीवादळ आंध्रात, तडाखा लातूरला |Gulab Cyclone News

मुंबई तक

ADVERTISEMENT

गुलाब चक्रीवादळ ओडिशा, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर आदळलं. महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील तपसे चिंचोली, लामजना, गाडवेवाडी शिवारात दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने सोयाबीन पिके पाण्याखाली गेली आहेत. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटामुळे आर्थिक अडचणीत असलेला शेतकऱ्याने कशीबशी यंदा काळ्या […]

social share
google news

गुलाब चक्रीवादळ ओडिशा, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर आदळलं. महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील तपसे चिंचोली, लामजना, गाडवेवाडी शिवारात दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने सोयाबीन पिके पाण्याखाली गेली आहेत. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटामुळे आर्थिक अडचणीत असलेला शेतकऱ्याने कशीबशी यंदा काळ्या आईची ओटी भरली. पाऊसही चांगला झाला. सोयाबीनचा भावही वाढला होता. आता सोयाबीन हाती येईल तर दोन पैसे हाती येतील असा आशावाद निर्माण झाला होता. मात्र सोयाबीनचा भावही घसरला आणि हाताशी आलेलं सोयाबीनही पाण्यात गेलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT