Manoj Jarange : ''तुम्ही फडणवीसांच ऐकून गेम करायलेत का?'', जरांगे प्रचंड भडकले

मुंबई तक

Manoj Jarange Health Update :  मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलनाला बसलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची प्रकृती  खालावली आहे. यावेळी डॉक्टरांचं पथक त्यांची तपासणी करत आहे. यावेळी जरांगे पाटलांनी डॉक्टरांवरच संशय व्यक्त केला आहे. ''तुम्ही फडणवीसांच ऐकून गेम करायलेत क? असा सवाल  जरांगे यांनी डॉक्टरांना केला आहे.

ADVERTISEMENT

google news

Manoj Jarange Health Update : गौरव साळी, जालना : मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलनाला बसलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची प्रकृती  खालावली आहे. यावेळी डॉक्टरांचं पथक त्यांची तपासणी करत आहे. यावेळी जरांगे पाटलांनी डॉक्टरांवरच संशय व्यक्त केला आहे. ''तुम्ही फडणवीसांच ऐकून गेम करायलेत क? असा सवाल  जरांगे यांनी डॉक्टरांना केला आहे.

 मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणचा आजचा चौथा दिवस आहे. काही वेळेपूर्वीच जरांगे यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांचं पथक आलं होतं. यावेळी जरांगे यांनी तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना चांगलंच झापलंय. 'माझी शुगर आधी 70 होती, मग ही शुगर आता 83 झाली कशी असा सवाल जरांगे यांनी तपासणी करणाऱ्या डॉक्टरांना केलाय. तुम्ही फडणवीसांच ऐकून, सरकारचं एकूण गेम करायलेत का?' असा सवाल ही जरांगे यांनी डॉक्टरांना केला आहे. 

हे वाचलं का?