नागपूर कार अपघात: चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आरोप, सुषमा अंधारेंची टीका
नागपूर कार अपघात प्रकरणात सुषमा अंधारे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव घेतलंय. बावनकुळे यांनी आरोप फेटाळताना गाडी त्यांच्या मुलाच्या नावावर असल्याचं सांगितलंय. त्यामुळे ठाकरे गट आणि भाजपामध्ये संघर्ष वाढला आहे.

ADVERTISEMENT
मद्यधुंद अवस्थेत महागड्या इलेक्ट्रॉनिक ऑडीने अनेक गाड्या उडवल्याच्या प्रकरणात सुषमा अंधारे यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव घेतलंय. ह्या आरोपानंतर बावनकुळे यांनी अंधारे यांचा आरोप फेटाळून लावताना गाडी त्यांच्या मुलाच्या नावावर असल्याचं मान्य केलं. यामुळं ठाकरे गट आणि भाजपामध्ये एक नवीन संघर्ष सुरू झालाय. सुषमा अंधारे यांनी केलेला आरोप आणि शेयर केलेला व्हिडिओ यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकारणात एक नविन वळण लागलं आहे. या प्रकरणाचं पुढील काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.