PM Modi: ‘काल काही लोक उड्या मारत होते’, मोदींचे राहुल गांधींना टोमणे
PM Narendra Modi Parliament Live Update: नवी दिल्ली: संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget session of Parliament) सातव्या दिवशी पंतप्रधान मोदी (PM ModI) हे लोकसभेत (Loksabha) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देत आहेत. काल (7 फेब्रुवारी) चर्चेदरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आणि अनेक प्रश्न विचारले. राहुल […]

ADVERTISEMENT
PM Narendra Modi Parliament Live Update: नवी दिल्ली: संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget session of Parliament) सातव्या दिवशी पंतप्रधान मोदी (PM ModI) हे लोकसभेत (Loksabha) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देत आहेत. काल (7 फेब्रुवारी) चर्चेदरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आणि अनेक प्रश्न विचारले. राहुल गांधी यांनी अदानी मुद्द्यावरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यावर उत्तर देताना सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना टोमणे लगावले आहेत. (parliament live updates pm modi taunts rahul gandhi while speaking in lok sabha)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. ‘पीएम मोदी म्हणाले की, काल काही लोक उड्या मारत होते. काल काही लोक बोलत होते, तेव्हा संपूर्ण इकोसिस्टम उसळत होती. पण काल त्यांना चांगली झोप लागली असावी म्हणून कदाचित ते आज उठू शकले नाही.’ असा टोमणा मोदींनी राहुल गांधींचं नाव न घेता त्यांना लगावला. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, ‘एका मोठ्या नेत्याने राष्ट्रपतींचा अपमानही केला आहे.’
पाहा पंतप्रधान मोदी लोकसभेतील भाषणात नेमकं काय-काय म्हणाले:
‘काही लोकांना देशाची प्रगती स्वीकारता येत नाही’
विरोधी पक्षांवर हल्लाबोल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘आज देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. काही लोकांना ते स्वीकारता येत नाही. आज खेळाडू आपला दर्जा दाखवत आहेत. भारताच्या डंका जगभरात वाजत आहे. भारत हे उत्पादनाचे केंद्र बनले आहे. आज देशातील प्रत्येक क्षेत्रात आशा दिसू लागली आहे, परंतु काही लोकांना ती दिसत नाही.’