आळंदी येथे पुणे पोलीस अनुष्का केदार आत्महत्या
पुणे पोलीस दलातील अनुष्का केदार यांनी आळंदीत इंद्रायणी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली.

ADVERTISEMENT
पुणे पोलीस दलातील अनुष्का केदार यांनी आळंदीत इंद्रायणी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली.
पुणे पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या २० वर्षीय पोलीस कॉन्स्टेबल अनुष्का केदार यांनी आळंदीत इंद्रायणी नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे पुणे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनुष्का पुणे ग्रामीण पोलीस दलातील मुख्यालयात कार्यरत होत्या. अनुष्काने रविवारी दुथडी वाहणाऱ्या इंद्रायणीत गरुड स्तंभाजवळून उडी घेतली. तिथे उपस्थित असलेल्या एका तरुणाने जीवाची पर्वा न करता अनुष्काला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने अनुष्काचा बचाव होऊ शकला नाही.