राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेतली. तिथे त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. सामनातील अग्रलेखावरही शरद पवार यांनी परखड भाष्य केलं. तसंच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.