Maharashtra Missing Women : महाराष्ट्रात बेपत्ता महिलांची संख्या लाखावर, Bombay High Court हस्तक्षेप करणार?
२०१९ ते २०२१ दरम्यान महाराष्ट्रात १ लाख मुली आणि महिला बेपत्ता असल्याची माहिती देत याचिका दाखल. न्यायमूर्ती उपाध्याय यांच्या खंडपीठात सुनावणी.

ADVERTISEMENT
Maharashtra Missing Women : मुंबई : २०१९ ते २०२१ या तीन वर्षांच्या काळात महाराष्ट्रातील १ लाख ८८२ मुली आणि महिला बेपत्ता असल्याची माहिती देत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. सरकारच्या कोषागार विभागात काम करणारे माजी सैनिक शहाजी जगताप यांनी अॅडव्होकेट मांजिरी पारसनीस यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. या धक्कादायक प्रकरणाची न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांच्या खंडपीठासमोर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.