Manoj Jarange Patil यांच्यावर हाकेंचा हल्लाबोल, पवारांचं नाव घेत काय केला आरोप?

मुंबई तक

मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही गंभीर आरोप केल्यानंतर आता त्यांना ओबीसी आरक्षणासाठी लढणारे लक्ष्मण हाके यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

google news

पुणे: मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित केलंय. त्यांनी आंदोलन स्थगित करताना देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत हल्लाबोल केलाय. एकेरी भाषेत बोलत त्यांनी फडणवीसांवर टीका केलीय. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे.

2013 मधल्या एका जुन्या प्रकरणामुळे जरांगेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याने मनोज जरांगे यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला असून पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हाही दाखल झालाय. यावर आता मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिलीय. मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप केल्यानंतर त्यांना लक्ष्मण हाके यांनी उत्तर दिलं आहे.