Ajit Pawar : घोषणा देणाऱ्यांचे टोचले कान, नंतर स्वतःच खळखळून हसले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ajit Pawar Speech Video : अजित पवार बारामती दौऱ्यावर होते. कार्यक्रमात भाषण करत असताना काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर मजेशीर किस्सा घडला, तो व्हिडीओमध्ये कैद झाला आहे.

social share
google news

Ajit Pawar video : अजित पवारांची भाषणाची शैली महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. अजित पवार भाषण करतात तेव्हा अनेक मजेशीर किस्से घडतात. रविवारी (4 ऑगस्ट) असाच एक किस्सा घडला. तोही बारामती तालुक्यात. (Ajit Pawar Speech video goes viral)

ADVERTISEMENT

शारदा शिक्षण संस्थेच्या प्रांगणात त्यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त हजार वृक्ष वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाषण सुरू असताना काही कार्यकर्ते 'एकच वादा अजितदादा' अशा घोषणा देत कार्यक्रमस्थळी आले. 

भाषण सुरू असताना कार्यकर्ते जोर जोरात घोषणा देऊ लागले. त्यामुळे अजित पवारांना आपलं भाषण थांबवावं लागलं. कार्यकर्ते शांत होत नसल्याचे बघून अजित पवारांनी हळूच एक विधान केले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला आणि ते शांत झाले. या चर्चेत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना संघटनेच्या उद्दिष्टांबद्दल आणि त्यांच्या जबाबदाऱ्या बद्दल मार्गदर्शन केलं.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT