Uddhav Thackeray आनंदाश्रमासमोरुन गेले पण गाडी थांबली नाही… काय घडलं?

मुंबई तक

Uddhav Thackeray passed in front of Anandashram but the car didn’t stop. ठाणे : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे गुरुवारी (२६ जानेवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात ते धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आनंद आश्रममध्ये जाणार असल्याचं सांगण्यात […]

ADVERTISEMENT

google news

Uddhav Thackeray passed in front of Anandashram but the car didn’t stop.

ठाणे : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे गुरुवारी (२६ जानेवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात ते धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आनंद आश्रममध्ये जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र नंतर त्यांनी आनंद आश्रमात जाण्याचं टाळलं. (Uddhav Thackeray passed in front of Anandashram but the car didn’t stop)

शिवसेना (UBT) खासदार राजन विचारे यांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या दौऱ्यादरम्यान, ठाकरे आनंद आश्रमात जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र धर्मवीर आनंद दिघे यांचं आनंद आश्रम हे ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे अधिकृत कार्यालय आहे. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांनी उद्धव ठाकरे हे आनंद आश्रमात का येत आहेत असा आक्षेप घेतला होता. तसंच त्यांनी स्थानिक पोलिसांकडेही आक्षेप नोंदविला होता.