महाराष्ट्रात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. पडलेल्या पावसामुळे प्रचंड प्रमाणात शेतीपिकांचं नुकसान झालं आहे. तूर, ज्वारी, कापूस ही सगळी पिकं भुईसपाट झाली. नाशिक जिल्ह्यात द्राक्षांचं पीक घेतलं जातं. या द्राक्षबागा जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला.