उद्धव ठाकरेंना घरी आणण्यासाठी राज ठाकरे रूग्णालयात जातात तेव्हा…

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानदुखीचा त्रास झाल्याने ते मुंबईतील रिलायन्स रूग्णालयात भरती आहेत. त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. याआधी २०१२ मध्ये उद्धव ठाकरेंच्या छातीत दुखू लागल्याने रूग्णालयात भरती करावं लागलं होतं. शस्त्रक्रिया करावी लागली होती. तेव्हा संपूर्ण ठाकरे कुटुंब काळजीत होतं. खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी फोन करून राज ठाकरेंना याबद्दलही हकीकत सांगितली. तसंच राज […]

social share
google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानदुखीचा त्रास झाल्याने ते मुंबईतील रिलायन्स रूग्णालयात भरती आहेत. त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. याआधी २०१२ मध्ये उद्धव ठाकरेंच्या छातीत दुखू लागल्याने रूग्णालयात भरती करावं लागलं होतं. शस्त्रक्रिया करावी लागली होती. तेव्हा संपूर्ण ठाकरे कुटुंब काळजीत होतं. खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी फोन करून राज ठाकरेंना याबद्दलही हकीकत सांगितली. तसंच राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंची रूग्णालयात जाऊन भेट घेण्यास सांगितलं. यानंतर अलिबाग दौऱ्यावर निघालेले राज ठाकरे रस्त्यातूनच माघारी फिरले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंची रूग्णालयात जाऊन भेट घेतली. लीलावती रूग्णालयातून त्यांनी भाऊ उद्धव ठाकरेंना यांना गाडी चालवत मातोश्रीवर नेलं. ठाकरे बंधुंच्या याच भावनिक नात्याचा कंगोरा मुंबई TAKच्या महाराष्ट्र डायरी सदरात कमलेश सुतार यांनी उलगडून दाखवलाय.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT