शरद पवार गटाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी चौफेर फटकेबाजी करत भाजप आणि अजित पवार गटावर टीका केली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना बारामती लोकसभा जिंकण्याबाबत वारंवार बोलावं लागतंय, ते घाबरले असून त्यांना तिथं यश मिळणार नाही, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.