मुंबईची खबर: नवीन वर्षाच्या सुरूवातीला फिरायला जायचा प्लॅन बनवताय? मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात होणार बदल ...
1 जानेवारी 2026 पासून मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होणार असल्याची माहिती आहे. मुंबई आणि पुणे यांना जोडणाऱ्या कित्येक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नवीन वर्षाच्या सुरूवातीला फिरायला जायचा प्लॅन बनवताय?
मध्य रेल्वेच्या 'या' गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार...
Mumbai News: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फिरायला जाण्याचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. 1 जानेवारी 2026 पासून मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होणार असल्याची माहिती आहे. मुंबई आणि पुणे यांना जोडणाऱ्या कित्येक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. यामध्ये, हाय-स्पीड 'वंदे भारत एक्सप्रेस'चा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे, फिरायला जायचा कोणताही प्लॅन बनवण्यापूर्वी ट्रेनचं वेळापत्रक नक्की तपासा.
1 जानेवारीपासून लागू होणार नवं वेळापत्रक...
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुविधाजनक करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 1 जानेवारीपासून लागू होणाऱ्या या नवीन वेळापत्रकामुळे, मुंबईतून सुटणाऱ्या आणि मुंबईत पोहचणाऱ्या गाड्यांच्या वेळेत 5 ते 15 मिनिटांचा फरक असेल.
मुंबई-पुणे-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या वेळेत काही मिनिटांनी बदल करण्यात आला आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि टेक्निकल सुधारणांमुळे हा बदल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे, प्रवाशांना आता बदललेल्या वेळेनुसार प्लॅटफॉर्मवर उपस्थित राहणं आवश्यक असणार आहे.
हे ही वाचा: Govt Job: 2026 साठी रेल्वे बोर्डाकडून नवी भरती जाहीर! काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?
लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
केवळ 'वंदे भारत'च नव्हे तर, मुंबई-पुणे मार्गिकेची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंटरसिटी, सिंहगड एक्स्प्रेस आणि डेक्कन क्वीन सारख्या गाड्यांच्या वेळेत काही प्रमाणात बदल होणार असल्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, रेल्वेने सकाळी मुंबईत येणाऱ्या किंवा रात्री निघणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे प्लॅटफॉर्म आणि वेळापत्रकात बदल केल्याची माहिती आहे.










