नांदेड : विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याचा राग, महिलेच्या पतीला पेट्रोल टाकून पेटवलं

मुंबई तक

Nanded Crime : बेंद्री गावातील संतोष माधवराव बेंद्रीकर हा आपल्या शेजारी राहणाऱ्या एका विवाहित महिलेकडे सातत्याने वाईट नजरेने पाहत होता. वेळोवेळी त्याने महिलेशी गैरवर्तन करत विनयभंग केल्याचा आरोप आहे. अखेर त्रास सहन न झाल्याने संबंधित महिलेने 22 डिसेंबर रोजी संतोष बेंद्रीकरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला.

ADVERTISEMENT

Nanded Crime
Nanded Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नांदेड : विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याचा राग

point

महिलेच्या पतीला पेट्रोल टाकून पेटवलं

Nanded Crime, नांदेड : नायगाव तालुक्यातील बेंद्री गावात माणुसकीला काळीमा फासणारी आणि अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका विवाहित महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून आरोपी व त्याच्या नातेवाइकांनी थेट सूड उगवलाय. फिर्यादी महिलेच्या पतीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. या हल्ल्यात संबंधित पती गंभीररीत्या भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली आहे. ही धक्कादायक घटना 29 डिसेंबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली.

अधिकची माहिती अशी की, बेंद्री गावातील संतोष माधवराव बेंद्रीकर हा आपल्या शेजारी राहणाऱ्या एका विवाहित महिलेकडे सातत्याने वाईट नजरेने पाहत होता. वेळोवेळी त्याने महिलेशी गैरवर्तन करत विनयभंग केल्याचा आरोप आहे. अखेर त्रास सहन न झाल्याने संबंधित महिलेने 22 डिसेंबर रोजी संतोष बेंद्रीकरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला.

गुन्हा दाखल होताच गावात तसेच दोन्ही कुटुंबांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांनी सूडबुद्धीने थरकाप उडवणारा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपींनी संगनमत करून फिर्यादी महिलेच्या पतीला एकटे गाठण्याची संधी साधली. पहाटेच्या वेळी ते आपल्या गोठ्यात असताना आरोपी व त्याच्या नातेवाइकांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. हल्लेखोरांनी पतीच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी अवस्थेत पतीने आरडाओरडा केल्यानंतर काही ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. त्यांच्या मदतीने आग विझवण्यात आली आणि गंभीर अवस्थेत जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, पती सुमारे 50 टक्के भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

या अमानुष घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासानंतर मुख्य आरोपी संतोष बेंद्रीकरसह आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर बेंद्री गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढवला असून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारीनंतर कायद्याचा आधार घेणाऱ्यांवरच हल्ले होत असल्याने या घटनेने समाजमन हादरले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp