ओडिशाच्या मिनाती पटनायक यांनी कोट्यवधींची संपत्ती रिक्षाचालकाला का दिली?
घरदार, जमीनजुमल्यासाठी लोक आयुष्याची सारी जमापुंजी लावत असतात, तिथेच ओडिशातल्या एका आजीबाईंनी आपली सारी जमीनजायदाद रिक्षावाल्याच्या नावाने केलीय. मिनाती पटनायक, असं या महिलेचं नाव असून त्या ६३ वर्षांच्या आहेत. त्या ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील सुताहत भागात राहतात. आयुष्याच्या या टप्प्यावर त्या एकट्याच राहतात. किडनी फेल झाल्यानं गेल्यावर्षीच त्यांच्या पतींचं निधन झालं. यानंतर यंदा त्यांच्यावर नवं संकट […]

ADVERTISEMENT

घरदार, जमीनजुमल्यासाठी लोक आयुष्याची सारी जमापुंजी लावत असतात, तिथेच ओडिशातल्या एका आजीबाईंनी आपली सारी जमीनजायदाद रिक्षावाल्याच्या नावाने केलीय. मिनाती पटनायक, असं या महिलेचं नाव असून त्या ६३ वर्षांच्या आहेत. त्या ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील सुताहत भागात राहतात. आयुष्याच्या या टप्प्यावर त्या एकट्याच राहतात. किडनी फेल झाल्यानं गेल्यावर्षीच त्यांच्या पतींचं निधन झालं. यानंतर यंदा त्यांच्यावर नवं संकट कोसळलं. त्यांच्या मुलीचा कार्डिअक अरेस्टमुळे अकाली निधन झालं. बुधा समल हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. गेल्या २५ वर्षांपासून बुधा आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब मिनाती पटनायक यांच्या घरी काम करतं. आणि तेही कोणत्याही लालचेशिवाय.