Mithun Chakraborty:उद्धव ठाकरेंनंतर ममता बॅनर्जींचं सरकार कोसळणार?; 38 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा

मुंबई तक

मिथुन चक्रवर्ती यांनी नुकत्याच केलेल्या विधानाने पश्चिम बंगालच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्रासारखा राजकीय भूकंप होऊ शकतो, असा दावा मिथून चक्रवर्तींनी दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर ममता बॅनर्जी यांचं सरकार संकटात असल्याची चर्चा सुरू झालीये. ममत बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाचे ३८ आमदार भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

मिथुन चक्रवर्ती यांनी नुकत्याच केलेल्या विधानाने पश्चिम बंगालच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्रासारखा राजकीय भूकंप होऊ शकतो, असा दावा मिथून चक्रवर्तींनी दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर ममता बॅनर्जी यांचं सरकार संकटात असल्याची चर्चा सुरू झालीये.

ममत बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाचे ३८ आमदार भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा मिथुन चक्रवर्ती यांनी केला आहे. त्यापैकी 21 आमदार असे आहेत जे थेट माझ्या संपर्कात असल्याते मिथुन चक्रवर्ती म्हणाले आहेत.

पश्चिम बंगालमध्येही महाराष्ट्रासारखं होऊ शकतं -मिथुन चक्रवर्ती

मिथुन चक्रवर्तींना याबाबत अधिक विचारले असता ते म्हणाले चित्रपटाच्या आधी संगीत आणि नंतर ट्रेलर रिलीज होतो. संगीत नुकतेच रिलीज झाले आहे. आता ट्रेलरची वाट पहा. मी मुंबईत झोपलो होतो. मला जाग आली आणि अचानक बातमी पाहिली, भाजप आणि शिवसेनेचे सरकार स्थापन झाले आहे. हे काय झालं. हे बंगालमध्ये देखील होऊ शकते. बंगालमध्ये अशा गोष्टी होणार नाहीत असे मी म्हणत नाही, असे मिथुन चक्रवर्ती पत्रकार परिषदेत म्हणाले आहे. भाजपला मुस्लीमविरोधी म्हणणे हे केवळ एक षडयंत्र आहे, प्रत्यक्षात तसे काहीही नाही असेही चक्रवर्ती म्हणाले.

मिथुन चक्रवर्ती यांनी गेल्या वर्षीच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आता पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. भाजपच्या मुस्लीमविरोधी प्रतिमेवर प्रश्न विचारला असता मिथुन म्हणाले की, भाजप दंगली घडवते असा नेहमीच आरोप केला जातो. पण मी स्पष्टपणे सांगतो की हा केवळ विरोधी पक्षांच्या कटाचा भाग आहे.

मिथून चक्रवर्तींनी दिलं सलमान, शाहरुख आणि आमिरचं उदाहरण

मिथुन पुढे म्हणाले की, भाजपला मुस्लिम विरोधी बोलले जाते. पण असे का होते? ते म्हणाले की, भारतातील तीन मोठे स्टार सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान हे मुस्लिम आहेत. हे कसे शक्य झाले?

हे वाचलं का?

    follow whatsapp