पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल एकाच ठिकाणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल काल (2 मे) जाहीर झाले आहेत. या पाचही राज्यातील निवडणुकीकडे आज संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. कारण येथील निकालांचे अनेक प्रकारे पडसाद हे संपूर्ण देशात उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हे निकाल अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

प. बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यात मागील महिन्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. याचे निकाल आता जाहीर झाले आहेत. जाणून घ्या या पाचही राज्यातील निवडणुकींच्या निकालाविषयी:

पश्चिम बंगाल

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमधील सर्वात चर्चा होती ती प. बंगाल निवडणुकीची. या निवडणुकांसाठी भाजपने बरीच तयारी केली होती. यासाठी पंतप्रधानांसह अनेक भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी आणि दिग्गज नेत्यांनी बऱ्याच सभा देखील होत्या. पण तरीही भाजपला येथील सत्ता काबीज करता आली नाही.

हाती आलेल्या निकालानुसार तृणमूल काँग्रेस तब्बल 213 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपला अवघ्या 77 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. याचा अर्थ प. बंगालमध्ये तृणमूल बंगाल सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज केली आहे. 292 जागांपैकी तब्बल 213 जागा तृणमूलला मिळाल्याने बंगाली जनतेने त्यांना पुन्हा एकदा एकहाती सत्ता देऊ केली आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि डावे पक्ष हे जवळजवळ नामशेष झाल्याचं दिसून येत आहे.

ADVERTISEMENT

रडीचा डाव ! ममता बॅनर्जींच्या पराभवानंतर शरद पवारांनी संतप्त प्रतिक्रीया

ADVERTISEMENT

तामिळनाडू

या निवडणुकांमधील दुसरं महत्त्वाचं राज्य म्हणजे तामिळनाडू. विधानसभेच्या तब्बल 234 जागा असलेल्या तामिळनाडूत यंदा सत्ताबदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण गेले सलग दोन टर्म AIADMK सत्तेत होतं. पण यावेळी एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्त्वात DMK ने तामिळनाडूत सत्ताबदल घडवून आणला आहे. यावेळी तामिळनाडूतील जनतेने देखील डीएमकेला स्पष्ट बहुमत दिलं असल्याचं दिसून येत आहे. यावेळी डीएमकेने तब्बल 156 जागांवर विजय मिळवला आहे. तर सलग दोन टर्म सत्तेत असलेल्या एआयएडीएमकेला अवघ्या 76 जागा मिळाल्या आहेत. याचाच अर्थ तामिळनाडूत डीएमकेने एकहाती सत्ता स्थापन केली आहे. दुसरीकडे स्वत:चा पक्ष काढून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अभिनेता कमल हासन यांना देखील पराभवाचं तोंड पाहायला लागलं आहे.

केरळ

विधानसभा निवडणूक पार पडलेल्या पाच राज्यांपैकी तिसरं महत्त्वाचं राज्य हे केरळ आहे. कारण इथे देखील भाजपची डाव्यांशी सतत संघर्ष सुरु होता. केरळची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपकडून बराच प्रयत्न केला गेला. पण केरळच्या जनतेने पुन्हा एकदा LDF वर विश्वास दाखवत पिनराई विजयन यांच्याकडे सत्ता सोपवली आहे. यावेळी एलडीएफला 97 जागांसह बहुमत मिळालं आहे. तर यूडीएफला 41 जागांवर समधान मानावं लागलं आहे. तर भाजपला इथे खातंही उघडता आलेलं नाही.

बंगालमध्ये भाजपचा पराभव, पाहा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोणत्या शब्दात केला भाजपवर हल्लाबोल

आसाम

भौगोलिकदृष्ट्या आसाम हे ईशान्येकडील सर्वात महत्त्वाचं राज्य आहे. या राज्यात भाजपने आपली सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवलं आहे. इथे काँग्रेसने भाजपला टक्कर देण्याचा काहीसा प्रयत्न केला. पण तो फार पुरेसा ठरला नाही. कारण आतापर्यंत आसाममध्ये भाजपने 76 जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला 49 जागांवर विजय मिळवता आला आहे. म्हणजेच आसाममध्ये सलग दुसऱ्यांदा भाजप सत्तेत आलं आहे.

पुदुद्चेरी

विधानसभेच्या अवघ्या 30 जागा असलेल्या पुद्दुचेरी विधानसभेत भाजपने 16 जागांवर विजय मिळवत काठावरचं बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे सध्या तरी पुद्दुचेरीमध्ये भाजपची सत्ता असल्याचं दिसून येत आहे. पण हा विजय भाजपसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कारण कर्नाटक वगळता दक्षिणेकडील एकाही राज्यात भाजपची सत्ता नव्हती. मात्र, आता पुद्दुचेरीच्या निमित्ताने भाजपने आणखी एक राज्य मिळवलं आहे. दरम्यान या निवडणुकीत काँग्रेसला 8 जागांवर विजय मिळला आहे. तर 6 जागांवर इतरांनी विजय मिळवला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT