Master Cards vs Other Cards: RBI ने बंदी घातलेलं Master Card नेमकं आहे तरी काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) Master Card वर बंदी घालण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला ज्यानंतर Master Card नेमकं काय आहे आणि याच्याशिवाय दुसऱ्या कार्डमध्ये नेमका काय फरक आहे? असा प्रश्न अनेकांना सतावू लागला आहे. याचबाबत आता आम्ही आपल्याला सविस्तरपणे सांगणार आहोत.

Digital Payments च्या युगात आता हळूहळू बऱ्याच गोष्टी या कॅशलेस होत आहेत. प्रत्येक जण हा क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा सर्रासपणे वापर करत आहे. पण याच कार्डमध्ये Rupay, VISA आणि Master Card असे तीन प्रकार पाहायला मिळतात. कोणतीही बँक असो यापैकी एक कार्ड आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. पण आता सध्या Master Card विषयी खूपच चर्चा सुरु आहे. जाणून घेऊया हे कार्ड नेमकं आहे तरी काय.

Plastic Money चा वापर आता सुरु झाला असं आता म्हटलं जातं. म्हणजेच आपण एखादी वस्तू खरेदी करताना रोकड पैशांऐवजी क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर केला जातो. यालाच Plastic Money असं म्हणतात. चला आता आपण जाणून घेऊयात Master Card म्हणजे नेमकं काय

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Master Card नेमकं काय असतं?

आपण पाहिलं असेल की, आपण जेव्हा बँकेत आपलं खातं सुरु करतो तेव्हा आपल्याला डेबिट कार्ड दिलं जातं ज्यामध्ये आपल्याला RuPay, Visa किंवा Master Card दिलं जातं. खरं म्हणजे हे तीनही कार्ड एक Payment Gateway आहे.

ADVERTISEMENT

ज्याच्या मदतीने आपण कोणतंही पेमेंट करु शकतात. आपण हे ATM मशीनमध्ये वापरु शकतात तसेच एखादं Payment करण्यासाठी POS मशीनचा देखील वापर करु शकतात. त्यावेळी हे गरजेचं नाही की, आपण जे पेमेंट करत आहात ते त्याच बँकेच हवं ज्या बँकेचे आपण अकाउंट होल्डर हवेत. ते कोणत्याही बँकेचं किंवा अकाउंट होल्डर असू शकतं.

ADVERTISEMENT

अशावेळी आपल्याला एका मध्यस्थाची गरज असते. जे हा सर्व व्यवहार हँडल करु शकेल आणि ते पुढे पाठवू शकेल. हेच पेमेंट गेटवे आपल्या बँक आणि आपण ज्या बँक अकाउंटमध्ये पैसे पाठवित आहात त्या बँकेच्या दरम्यान एका मध्यस्थाचं काम करत असतो. हेच काम करण्यासाठी त्यांना ठराविक कमिशन देखील मिळतं.

Master Card आणि Rupay Card मध्ये नेमका फरक काय आहे?

जर Master Card आणि Rupay Card यांचा आपण विचार केला तर हे दोन्ही कार्ड फारच वेगळे असल्याचं आपल्याला दिसून येईल. मास्टर कार्ड हे एक आंतरराष्ट्रीय (US) कंपनीचं आहे. त्यामुळे जेव्हा आपण या कार्डचा वापर करतो तेव्हा Data Processing and Verification साठी ते कंपनीच्या सर्व्हरमध्ये जातं आणि त्यामुळे याच्या प्रोसेसिंगला थोडा जास्त वेळ लागतो.

पण आपण जर Rupay Card चा वापर केलात तर त्या कार्डचं सर्व्हर हे आपल्या देशातच उपलब्ध आहे. त्यामुळे त्याची प्रोसेस अधिक वेगाने होते. तसंच जेव्हा आपण Rupay Card ची मागणी करता तेव्हा आपल्याकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. पण आपल्याला Visa Card साठी काही शुल्क भरावं लागतं.

Master Card हे एक परदेशी Payment Gateway आहे जे जगातील बहुतेक देशातील बँकांना आपल्या कार्डद्वारे पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध करुन देतं.

Big News : Master Card वर RBI ने घातली बंदी ‘हे’ आहे कारण

असं म्हटलं जातं की, Master Card हे Online शॉपिंगसाठी सगळ्यात चांगला ऑप्शन मानला जातो. कारण याच्यामार्फत आपण आंतरराष्ट्रीय ट्रान्जेक्शन आणि शॉपिंग देखील करु शकतात.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT