चंदीवाल कमिशनकडून Parambir Singh यांना २५ हजारांचा दंड - Mumbai Tak - while anil deshmukhs lawyer prays for warrant to be issued for param bir singh chandiwal commission imposes 25k fine - MumbaiTAK
बातम्या

चंदीवाल कमिशनकडून Parambir Singh यांना २५ हजारांचा दंड

एक सदस्यीय निवृत्त न्यायाधीश जस्टीस के.यु.चंदीवाल यांच्या आयोगाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. सलग तिसऱ्यांदा परमबीर सिंग चंदीवाल आयोगासमोर चौकशीसाठी गैरहजर राहिले आहेत. यावेळी आयोगाने परमबीर सिंग यांना शेवटची संधी देताना ३० ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याआधीही १८ ऑगस्टला झालेल्या सुनावणीदरम्यान चंदीवाल आयोगाने परमबीर यांना शेवटची […]

एक सदस्यीय निवृत्त न्यायाधीश जस्टीस के.यु.चंदीवाल यांच्या आयोगाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. सलग तिसऱ्यांदा परमबीर सिंग चंदीवाल आयोगासमोर चौकशीसाठी गैरहजर राहिले आहेत. यावेळी आयोगाने परमबीर सिंग यांना शेवटची संधी देताना ३० ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

याआधीही १८ ऑगस्टला झालेल्या सुनावणीदरम्यान चंदीवाल आयोगाने परमबीर यांना शेवटची संधी दिली होती.

परमबीर सिंग यांनी आपल्या वकीलातर्फे, आपण या आयोगाच्या कामकाजाला उच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे, त्यामुळे आपण आयोगासमोर हजर राहू शकणार नसल्याचं सांगितलं. आतापर्यंत चंदीवाल कमिशनने परमबीर यांना ४ वेळा समन्स बजावली आहे.

आयोगाचं प्रतिनिधीत्व करणारे वकील शिशिर हिर्ये यांनी परमबीर यांच्या वागणुकीवर आक्षेप नोंदवला. “आयोगाला हे काम प़ूर्ण करण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी मिळालेला आहे. जर हे असंच सुरु राहिलं तर आयोग आपलं कामच करु शकणार नाही आणि योग्य न्यायदानाचं काम होणार नाही.” अनिल देशमुखांची बाजू मांडणाऱ्या वकील अनिता कास्टेलिनो यांनीही परमबीर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं.

“हीच सबब ते गेल्या काही दिवसांपासून देत आहेत. आयोगाचा वेळ वाया घालवण्याचं हे काम आहे. आयोगाने परमबीर यांच्या नावाने वॉरंट जारी करावं ज्यामुळे ते चौकशीसाठी हजर राहतील. या आयोगाला वॉरंट जारी करण्याचे अधिकार आहेत.” १८ ऑगस्ट रोजी चंदीवाल कमिशनने परमबीर यांना २५ हजारांचा दंड ठोठावून ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत दान देण्यास सांगितलं. परमबीर यांनी दंडाची ही रक्कम अद्याप भरलेली नाहीये. त्यातच आयोगाने त्यांना आणखी २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. ज्यामुळे परमबीर यांना ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

अनिल देशमुख यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना १०० कोटींची वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं असा आरोप केला होता. या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चंदीवाल आयोगाची स्थापना केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × two =

Raveena Tandon चं करिअर करिष्मामुळे फ्लॉप? म्हणाली.. अभिनेत्रीला सेटवरून काढलं, लोकप्रिय होऊनही करावा लागला संघर्ष! रवीना-अक्षयचं झालं होतं ब्रेकअप? पहिल्यांदाच EX वर दिली प्रतिक्रिया Jio vs Airtel: सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान कोण देणार? नाना-शाहरुखचे संबंध बिघडले? नेमक काय घडलं त्यांच्या नात्यात… सुहाना ते सारा… टॉप स्टारकिड्सचा देसी अंदाज! Parineeti च्या लग्नाला पोहोचली बेस्टी सानिया, काय दिलं खास गिफ्ट? राघव-परिणीती यांची कशी झाली पहिली भेट? पाहा Photo Ganesh Visarjan : गणपती चालले गावाला… मुंबईत दणक्यात होणार बाप्पाचं विसर्जन! Ganesh Visarjan 2023 : अनंत चतुर्थी दिवशी बाप्पाच्या विसर्जनाचं महत्त्व काय? आमिर खान पोहचला बाप्पाच्या दर्शनासाठी, हात जोडून केली प्रार्थना… Mumbai Traffic : गणपती विसर्जनाच्या दिवशी ‘या’ रस्त्यांवरून जाणं टाळाच भारतीय क्रिकेटर तापाने फणफणले! रोहित शर्मा म्हणाला.. 10 वर्षांनी मोठ्या सैफसोबत कशी सुरूये करिनाची मॅरेज लाईफ? लग्नानंतर परिणीती चोप्रा मुंबई सोडून जाणार? कारण… ठाण्यात फ्लॅटमध्ये घुसला भलामोठा अजगर, पाहा Viral VIDEO भूमी पेडणेकरची Butt Bag, किंमत तब्बल… ओठांच्या आकारावरून समजते पर्सनॅलिटी, तुमची कशी आहे ओळखा? रिकाम्या पोटी गोड पदार्थांचं सेवन टाळा! नाहीतर… दारूचा ‘पेग’ कसा आला? काय आहे अर्थ?