Pune : बापटांना घाम फोडला, आता रासनेंशी दोन हात, कोण आहेत रवींद्र धंगेकर?
Ravindra Dhangekar | Congress : पुणे : कसबा पेठ विधानसभेची पोटनिवडणूक रंगतदार झाली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी ब्राम्हणेत्तर उमेदवारांना तिकीट दिलं आहे. भाजपकडून माजी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांना तिकीट मिळालं. तर काँग्रेसकडून उमेदवारीची माळ रवींद्र धंगेकर यांच्या गळ्यात टाकण्यात आली. पहिल्यांदाच कसब्याच्या आखाड्यात दोन प्रमुख पक्षांकडून ओबीसी उमेदवार आमनेसामने आलेत. […]
ADVERTISEMENT

Ravindra Dhangekar | Congress :
पुणे : कसबा पेठ विधानसभेची पोटनिवडणूक रंगतदार झाली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी ब्राम्हणेत्तर उमेदवारांना तिकीट दिलं आहे. भाजपकडून माजी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांना तिकीट मिळालं. तर काँग्रेसकडून उमेदवारीची माळ रवींद्र धंगेकर यांच्या गळ्यात टाकण्यात आली. पहिल्यांदाच कसब्याच्या आखाड्यात दोन प्रमुख पक्षांकडून ओबीसी उमेदवार आमनेसामने आलेत. (who is congress candidate ravindra dhangekar contesting kasba peth assembly bypoll
पण कसब्याच्या लढतीत चुरस वाढवणारे रवींद्र धंगेकर कोण आहेत, गिरीश बापटांशी त्यांचा सामना कसा झाला होता, आणि धंगेकरांच्या जमेच्या आणि विरोधातल्या गोष्टी काय आहेत?
Ravindra Dhangekar : हेमंत रासनेंविरोधात काँग्रेसने जाहीर केला उमेदवार
कोण आहेत रवींद्र धंगेकर?
रवींद्र धंगेकर यांचा शिवसेना, मनसे आणि काँग्रेस असा त्रिकोणी राजकीय प्रवास झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू अशी धंगेकरांची ओळख राहिली आहे. मनसेमध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या पदावर काम केलं. इथंच त्यांची राजकीय कारकीर्द फुलली. ४ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. याकाळात त्यांनी कसब्यामध्ये बरीचं विकासकामं केली.
याच विकासकामांच्या जोरावर त्यांनी मनसेकडून २००९ ची विधानसभा निवडणूक लढली. यात त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार आणि तत्कालिन उमेदवार गिरीश बापट यांना तगडं आव्हान दिलं. मातब्बर बापट नवख्या धंगेकरांकडून अवघ्या ७ हजार मतांनी विजयी झाले. यातूनच खासदार गिरीश बापट यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.
Kasba Bypoll: ठाकरेंचा विश्वासू ते काँग्रसेचा उमेदवार, कोण आहेत रविंद्र धंगेकर?
२०१४ मध्येही कसबा पेठेतून धंगेकरांनी निवडणूक लढवली. पण तेव्हा त्यांचा पराभव झाला. पुढे जानेवारी २०१७ मध्ये कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण २०१९ मध्ये काँग्रेसनं धंगेकरांऐवजी अरविंद शिंदेंना तिकीट दिलं. धंगेकर ओबीसी समाजातून येतात. कसबा मतदारसंघात ओबीसी आणि मराठा समाजाचा मोठा टक्का आहे.
कसबा हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे. सुमारे ४० वर्षं इथे भाजपचा आमदार निवडून आला आहे. मात्र, यंदा या मतदारसंघाचं गणित वेगळं आहे. एका बाजूला दगडूशेठ गणपती आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून काम करणारा हेमंत रासनेंसारखा उमेदवार भाजपनं मैदानात उतरवला आहे. तर दुसरीकडे भाजपसमोर महाविकास आघाडीतील ३ पक्ष एकत्र आलेत. त्यामुळे धंगेकरांना इतर घटक पक्षांची साथ कशी मिळते हे महत्वाचं ठरेल.
जात हा मुद्दाही या मतदारसंघात कळीचा ठरेल. कसबा हा जुन्या पुण्याच्या पेठांचा भाग आहे. कसबा पेठेसह शनिवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ, बुधवार पेठ, रास्ता पेठ, भवानी पेठ, लक्ष्मी रोड, तुळशीबाग या भागांचा समावेश या मतदारसंघात होतो. या भागात ब्राह्मण, मराठा आणि ओबीसी मतदारांची संख्या मोठी आहे. गेल्या चाळीस वर्षानंतर पहिल्यांदाच दोन्ही प्रमुख पक्षांनी ब्राम्हणेत्तर समाजातल्या व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. आता दोन्ही ओबीसी उमेदवार रिंगणात आहेत. अशावेळी कसब्याच्या ब्राह्मण मतदारांचा कौल निर्णायक ठरु शकेल. धंगेकर आणि रासने या दोघांचंही पारडं सध्यातरी समान वाटतं आहे. मात्र, कसब्याचा हा किल्ला कोण सर करणार हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईलच.