बायकोने फक्त सांगितलं दारु पिऊ नका.. वाचा नवऱ्याने नेमकं काय केलं! - Mumbai Tak - wife used to stop drinking alcohol in anger husband committed murder crime - MumbaiTAK
बातम्या

बायकोने फक्त सांगितलं दारु पिऊ नका.. वाचा नवऱ्याने नेमकं काय केलं!

भारत-पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या फाजिल्का येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीची अतिशय क्षुल्लक कारणासाठी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नी अनेकदा पतीला दारू पिऊ नये यासाठी रोखायची. याच गोष्टीवरुन पती पत्नीमध्ये अनेकदा टोकाचे वाद देखील व्हायचे. कधी-कधी पती आपल्या पत्नीला घराबाहेर देखील काढायचा. मृत महिलेचा भाऊ चरणजीत सिंह याने तक्रार दाखल करताना पोलिसांना सांगितले […]

भारत-पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या फाजिल्का येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीची अतिशय क्षुल्लक कारणासाठी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नी अनेकदा पतीला दारू पिऊ नये यासाठी रोखायची. याच गोष्टीवरुन पती पत्नीमध्ये अनेकदा टोकाचे वाद देखील व्हायचे. कधी-कधी पती आपल्या पत्नीला घराबाहेर देखील काढायचा.

मृत महिलेचा भाऊ चरणजीत सिंह याने तक्रार दाखल करताना पोलिसांना सांगितले की, या प्रकरणात मेव्हण्यासोबतच त्याचा पुतण्या आणि मेव्हण्याचा भाऊ देखील सहभागी आहेत. सध्या पोलिसांनी मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून महिलेचा पती, पुतण्या आणि पतीच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेची हत्या तिघांनी मिळून केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळे लवकरच या सगळ्यांना अटक केली जाईल.

पोलिसांनी महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. वेरो पोलिस स्टेशनचे एसएचओ हरप्रीत सिंह यांनी सांगितले की, पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल आणि हत्येमागील खरे कारणही कळेल.

अनैतिक संबंधात आड येणाऱ्या पतीची पत्नीने सुपारी देऊन केली हत्या

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बिहारमधील पूर्णिया येथून पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली होती. येथे एका महिलेने अनैतिक संबंधातून पतीच्या हत्येचा कट रचून त्याची हत्या केली होती. औषधांचे व्यापारी असलेले मोहन चंद्र दास यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण औषध विक्रेत्याशी संबंधित असल्याने एसपी दयाशंकर यांनी तपासासाठी एसआयटी स्थापन केली.

डीएसपी सुरेंद्रकुमार सरोज यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. या हत्येशी संबंधित प्राथमिक पुराव्यांच्या आधारे, या घटनेत सहभागी असलेल्या रमण या गोळीबाराला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या रमणची चौकशी केली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

गोळीबार करणाऱ्याच्या तोंडून हत्येची संपूर्ण कहाणी ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला. डीएसपी सुरेंद्र कुमार सरोज यांनी सांगितले की, पोलिसांनी व्यावसायिकाची पत्नी चुमकी दास, तिचा प्रियकर आयुष कुमार आणि शूटर रमन कुमार यांच्यासह मनीष कुमार आणि गौरव कुमार यांना अटक केली.

फेसबुकवरुन मैत्री.. अनैतिक संबंध; तहसलीदारानं केली महिला कॉन्स्टेबलची हत्या

या सगळ्यांच्या अटकेनंतर चौकशीत असे उघड झाले की, व्यावसायिकाची पत्नी चुमकी दास आणि आयुष कुमार यांचे चार वर्षांपासून अनैतिक संबंध होते. यावर व्यापारी सातत्याने आक्षेप घेत होता. पतीकडून सातत्याने होणारा विरोध यामुळे चुमकी हिला आयुषसोबत मोकळेपणाने वावरता येत नव्हतं. त्यामुळे तिने पतीला आपल्या वाटेतून कायमचं हटविण्यासाठी थेट जीवे मारण्याची सुपारीच दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × 2 =

अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग BB17: 19 वर्षीय अभिनेत्रीचे लाईव्ह ब्रेकअप, दुसरे नातेही तोडले Fitness पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण; सुपरस्टार्स आहेत तरी किती वर्षांचे? Beauty Tips: चाळीशीत दिसा अगदी टीप-टॉप! फक्त ‘या’ गोष्टी करा फॉलो! महाराष्ट्राचे मिनी काश्मीर, पाचगणी-महाबळेश्वर हरवले धुक्यात …म्हणून परिणीतीने ॲनिमल सोडला Liplock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, इंटिमेट सीनचा कहर ‘कपिल शर्मा शो’मध्ये ‘हा’ कलाकार घेतो सर्वाधिक मानधन? …तर आयुष्यभर कोलेस्ट्रॉल कमी नाही होणार सिगारेट सोडल्यानंतर शरीरामध्ये होतात ‘हे’ बदल दुधात साखर मिसळून पिता, तर आजच करा बंद …म्हणून हिवाळ्यात आलं खाणं ठरतं फायद्याचं Weight Loss: घरच्या घरी ‘हे’ 7 बेस्ट कार्डिओ वर्कआउट करा! नितळ अन् कोमल त्वचा हवीये? फॉलो करा हा ‘k’ फॉर्म्युला! दररोज ‘ही’ 5 छोटी कामं करून Belly Fat सहज करा कमी! ‘ही’ 5 पानं आहेत दीर्घायुष्याचं वरदान!