Holi 2023 : अशा द्या तुमच्या प्रिय व्यक्तींना होळीच्या शुभेच्छा

मुंबई तक

holi wishes in marathi, holi wishes in marathi text : अधर्मावर धर्माचा विजय म्हणजे होळी. भक्त प्रल्हादाला संपवण्यासाठी होलिकाने केलेल्या कटात तिच जळून भस्म झाली आणि धर्माचा विजय झाला. त्यानिमित्ताने होळीचं दहन केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. यानिमित्ताने पुरणपोळीचा आस्वाद घेत रंगांची उधळण केली जाते. या खास सणाच्या निमित्ताने तुम्हीही तुमच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

holi wishes in marathi, holi wishes in marathi text : अधर्मावर धर्माचा विजय म्हणजे होळी. भक्त प्रल्हादाला संपवण्यासाठी होलिकाने केलेल्या कटात तिच जळून भस्म झाली आणि धर्माचा विजय झाला. त्यानिमित्ताने होळीचं दहन केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. यानिमित्ताने पुरणपोळीचा आस्वाद घेत रंगांची उधळण केली जाते. या खास सणाच्या निमित्ताने तुम्हीही तुमच्या प्रिय व्यक्तींना शुभेच्छा देऊन सणांचा आनंद द्विगुणीत करा. holi chya hardik shubhechha in marathi

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी, रंगामध्ये रंगून जाण्याआधी, होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी, पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी… तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

फाल्गुण पौर्णिमेच्या शुभदिनी पेटवू वाईट विचारांची होळी.आनंदाने भरो आपली झोळी. साजरी करुया रंगेबेरंगी होळी… होळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा, रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे. होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

होळी पौर्णिमानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

कशी असते बंजारा समाजाची परंपरागत होळी, पाहा हे खास फोटो

रंगाहोळी पेटू दे द्वेष जळू दे, अवघ्या जीवनात नवे रंग भरू दे, होळीच्या सर्वांना शुभेच्छा.

रंगाचा सण हा आला, होळी पेटता उठल्या ज्वाला, दुष्टप्रवृत्तीच अंत हा झाला. सण आनंद साजरा केला

होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

वाईट सारे जळून जावे, चांगले उदयास यावे. दृष्ट प्रवृत्तींचा होवो नाश, सर्वांना लाभो सुखः शांती आज.

सर्वांना होळीच्या शुभेच्छा!

मत्सर, द्वेष, मतभेद विसरू, प्रेम, शांती, आनंद, चहुकडे पसरवू,

होळीच्या या पवित्र अग्निमध्ये नकारात्मकता दहन करू

होळीच्या शुभेच्छा!

रंगबिरंगी रंगाचा सण हा आला, होळी पेटता उठल्या ज्वाला, दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला, सण आनंदे साजरा केला, क्षणभर बाजूला सारू रोजच्या वापरातले वाईट क्षण ,रंग गुलाल उधळू

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Holi 2023 : होलिका दहन करण्यामागची कथा काय आहे?

टाकून द्या होळीत आयुष्याच्या अडचणी, चिंता, मनाचा गुंता..

करू होम दुःख, अनारोग्याचा

होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

भिजू दे रंग अन् अंग स्वच्छंद

अखंड उठु दे मनी रंग तरंग…

व्हावे अवघे जीवन दंग

असे उधळूया आज हे रंग…

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

हे वाचलं का?

    follow whatsapp