डोंबिवली : Lockdown जिवावर बेतलं, कर्जबाजारी झालेल्या तरुण व्यावसायिकाची आत्महत्या
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाउनची घोषणा केली. परंतू या लॉकडाउनचा फटका अनेक छोटे व्यापारी आणि व्यावसायिकांना बसतो आहे. डोंबिवलीत लॉकडाउनमुळे व्यवसाय ठप्प झाल्यामुळे एका तरुण व्यावसायिकाने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. सुरज सोनी असं या व्यावसायिकाचं नाव असून डोंबिवली पूर्व येथे दावडी भागातील साई गॅलक्सी या इमारतीत तो आपल्या कुटुंबासोबत रहायचा. […]
ADVERTISEMENT

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाउनची घोषणा केली. परंतू या लॉकडाउनचा फटका अनेक छोटे व्यापारी आणि व्यावसायिकांना बसतो आहे. डोंबिवलीत लॉकडाउनमुळे व्यवसाय ठप्प झाल्यामुळे एका तरुण व्यावसायिकाने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे.
सुरज सोनी असं या व्यावसायिकाचं नाव असून डोंबिवली पूर्व येथे दावडी भागातील साई गॅलक्सी या इमारतीत तो आपल्या कुटुंबासोबत रहायचा. डोंबिवली स्टेशन परिसरात मोबाईल रिपेअरिंग आणि पार्ट्सची खरेदी-विक्री सुरज करायचा. यातून मिळालेल्या पैशांवर सुरजच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हायचा. परंतू लॉकडाउन सुरु झाल्यापासून सुरजचा व्यवसाय ठप्प झाला ज्यामुळे त्याला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं.
घरात पत्नी आणि दोन मुलांची रोजची होणारी आबाळ, संपत चालेले पैसे या गोष्टींमुळे सुरज अस्वस्थ होता. लॉकडाउनच्या दीड ते दोन वर्षाच्या काळात सुरजने कसंबसं घर चालवलं. मध्यंतरी त्याने नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्याला त्यामध्येही अपयश आलं. नंतर सूरजची परिस्थिती इतकी खालावली की लाईट बिल भरायला पैसे नसल्यामुळे त्याच्या घरातलं वीज कनेक्शन तोडण्यात आलं.
थकलेलं घरभाडं, त्यात वीजबीलाचे पैसे नसल्यामुळे तोडलेलं कनेक्शन, बेरोजगारीची कुऱ्हाड यामुळे सुरज पूर्णपणे नैराश्यात गेला. सोमवारी दुपारी सूरजने आपल्या पत्नी आणि मुलांना भावाच्या घरी सोडत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सूरजला १३ वर्षांचा एक मुलगा आणि ७ वर्षांची एक मुलगी आहे. सूरजच्या अकाली जाण्यामुळे त्याच्या कुटुंबावरचं आर्थिक संकट अजुनच गडद झालंय. काही दिवसांपूर्वीच कल्याणमध्ये एका प्रिटींग प्रेस व्यवसायिकाने आर्थिक अडणचींमुळे आत्महत्या केली होती. यानंतर अवघ्या काही दिवसांत आणखी एका तरुण व्यवसायिकाने आपलं जीवन संपवल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Lockdown मुळे दीड वर्षांपासून व्यवसाय बंद, आर्थिक अडचणीमुळे कल्याणमधील व्यवसायिकाची आत्महत्या