कल्याण : गणपती विसर्जनादरम्यान विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

कल्याण पश्चिमेकडील बेतुरकर पाडा परिसरातली घटना
कल्याण : गणपती विसर्जनादरम्यान विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू
मृत तरुण प्रशांत चव्हाण

राज्यात कालच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांना वाजतगाजत निरोप देण्यात आला. परंतू कल्याणमध्ये विसर्जनाच्या सोहळ्याला गालबोट लागलं आहे. विजेचा धक्का लागून २८ वर्षीय तरुणाला आपले प्राण गमवावे लागले आहेत.

प्रशांत चव्हाण असं या तरुणाचं नाव असून या दुर्घटनेनंतर चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कल्याण पश्चिमेतील बेतुरकर पाडा येथील एव्हरेस्टनगर परिसरातील एव्हरेस्टनगर मित्र मंडळ काही वर्षापासून गणोशोत्सव साजरा करीत आहे. संध्याकाळी कल्याणमध्ये जोरदार पाऊस होता. या पावसादरम्यान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणपती विसजर्नासाठी बाहेर काढण्यास सुरुवात केली.

गणपती थोड्या अंतरावर गेला असता ज्या ठिकाणी गणपती बसविला होता. त्या ठिकाणचा वीज पुरवठा बंद चालू होत होता. हे चेक करण्यासाठी मंडळाचा कार्यकर्ता प्रशांत चव्हाण त्याठिकाणी गेला असता तपासणी दरम्यान त्याला विजेचा जोरदार झटका बसला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेला असता त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. प्रशांतच्या मागे त्याची आई आणि त्याचा लहान भाऊ आहे. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. या घटनेचा तपास कल्याणचे महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहेत.

Related Stories

No stories found.