Mumbai Tak /बातम्या / ठाकरेंच्या शिलेदाराचे नातेवाईकही अडचणीत येणार? ACB ने मागविली माहिती!
बातम्या राजकीय आखाडा

ठाकरेंच्या शिलेदाराचे नातेवाईकही अडचणीत येणार? ACB ने मागविली माहिती!

ACB seeks information of shivsena (ubt) mla nitin deshmukh’s relative’s property information

अकोला : बाळापुरचे आमदार नितिन देशमुख (Nitin Deshmukh) यांना लाच-लुचपत विभागाने चौकशी सुरु केली आहे. देशमुख यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात तक्रार आल्यानंतर ही चौकशी सुरु करण्यात आली आहे. १७ जानेवारीला चौकशीही झाली. अशातच आता देशमुख यांच्या इतर नातेवाईकांच्या मालमत्ता खरेदी-विक्रीचाही शोध घेणं एसीबीने सुरु केलं आहे. (ACB seeks information of shivsena (ubt) mla nitin deshmukh’s relative’s property information)

आमदार देशमुख यांच्या मालमत्ता खरेदी-विक्रीचा शोध घेऊन कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात अमरावती एसीबीनं अकोला जिल्ह्यातील पातूर तहसीलदारांना पत्र लिहिलं आहे. देशमुख यांचं मुळगाव ‘सस्ती’ हे पातूर तालुक्यात आहे. देशमुख यांचे भाऊ, बहिण, आई, पत्नी, मुलगा, मुलगी यांच्या नावाने संपत्ती घेतली असल्यास त्याबाबत शोध घेऊन माहिती सादर करण्यासचे निर्देश पातूर तहसीलदारांना देण्यात आले आहेत.

Mood Of the Nation: भारतीयांच्या मनात काय?, देशाच्या राजकारणाची दिशा बदलणारा सर्व्हे

दरम्यान, याबाबत बोलताना आमदार देशमुख म्हणाले, एसीबीने पातूर तहसीलदारांना माझ्या नातेवाईकांच्या संदर्भात संपूर्ण माहिती मागिवली. निश्चितपणे तालुक्यातील तहसीलदार ही माहिती देतील. पण माझी हिशोबी मालमत्तेच्या तक्रारीमध्ये माझा पुण्याला बंगला असल्याचं, मुंबईला फ्लॅट असल्याचं सांगितलं आहे आणि याचीही चौकशी झाली पाहिजे. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना आपल्या संपत्तीचा तपास करण्याचे आदेश द्यावे असा टोला त्यांनी लगावला आहे.

Mood of the Nation: भारत जोडो यात्रा मोदींच्या सत्तेला सुरुंग लावेल का?

नितीन देशमुख हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निष्ठावंत आमदार म्हणून ओळखले जातात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला साथ न देता गुवाहटीच्या रस्त्यातून नितीन देशमुख पळून आले होते. शिंदे गटाने सुरतला पळवून नेत गुवाहटीला जाण्यासाठी दबाव आणला, मात्र मी तिथून पळून आल्याचं नितीन देशमुख यांनी सांगितलं होतं. 

राजन साळवी, वैभव नाईक यांचीही सुरु आहे चौकशी :

दरम्यान, नितीन देशमुख यांच्यापूर्वी डिसेंबर महिन्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे राजापूरचे आमदार आणि उपनेते राजन साळवी आणि आमदार वैभव नाईक यांनाही बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात नोटीस देण्यात आली आहे. हे दोन्ही आमदार लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आले आहेत. 

---------
PM मोदींची नवीन संसद भवनाला सरप्राईज व्हिजीट; प्रत्येक कामाचा घेतला आढावा कोहलीने शेअर केली आपली 10 वीची मार्कशीट, मिळालेले किती टक्के? ‘मेरा दिल तेरा दिवाना…’, तरुणी अचानक रेल्वे स्टेशनवर का नाचली? Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री IPL 2023 : 12 क्रिकेटपटू खेळू शकणार नाही सुरूवातीचे सामने, पहा कोण आहेत ते? मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री…