आदित्य ठाकरेंची टोलेबाजी! देवेंद्र फडणवीसांच्या फॉक्सकॉन, टाटा प्रकल्पांवरून केलेल्या आरोपांना उत्तरं

जाणून घ्या काय म्हणाले आहेत आदित्य ठाकरे?
Aditya Thackeray Answers All the Allegations by Dcm Devendra Fadnavis
Aditya Thackeray Answers All the Allegations by Dcm Devendra Fadnavis

टाटा एअरबस किंवा फॉक्सकॉनबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. ते एका अर्थाने बरंच झालं. त्यामुळे त्यांना कुणाच्या हातून माईक खेचण्याची किंवा कुणाला चिठ्ठी द्यायची वेळ आली नाही. एवढंच नाही तर आज मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतल्याने राज्यात वजन कुणाचं जास्त आहे हे दिसून आलं असं म्हणत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी टोला लगावला.

नेमकं काय म्हणाले आहेत आदित्य ठाकरे?

वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस, बल्क ड्रग पार्क अशी बाहेर गेलेल्या उद्योगांची यादी मोठी आहे. हे सगळे उद्योग गेल्यावर आम्हाला सगळ्यावर आम्हाला उत्तर दिलं होतं की आपल्या राज्याला यापेक्षा खूप मोठा प्रोजेक्ट मिळणार आहे. आकडे कसे बदलायचे आणि घटनाबाह्य सरकार कसं आणायचं ते यांना माहित आहे. आज महाराष्ट्राला जो प्रकल्प मिळाला आहे तो दोन हजार कोटींचा आहे. मला हे माहित नव्हतं की १ लाख ४९ हजार कोटींपेक्षा हा आकडा मोठा आहे. राज्यात गुंतवणूक होणार आहे हे चांगलंच आहे. देवेंद्र फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्री होते किंवा जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा २ हजार कोटी एवढ्या छोट्या रकमांच्या घोषणा करत नव्हते. आता आज ती घोषणाही केली गेली आहे.

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत

२३ मे २०२२ ला त्यांनी दाखवलेल्या प्रकल्पाचं MoU साईन झाला आहे. मागच्या सरकारचं काम त्यांनी आज आपलं म्हणून दाखवलं. ते क्रेडिट घेऊ शकलं. तुमच्या क्रिएटिव्हवर आलेलं हे आहे असं म्हणत आदित्य ठाकरेंनी तो कागद दाखवला. आज देवेंद्र फडणवीस यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांना जे ब्रिफिंग मिळालं आहे ते चुकीचं दाखवलं आहे. सुभाष देसाईंची बातमी आज पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंनी दाखवली. ही बातमी जर देवेंद्र फडणवीस यांनी वाचली असती तर त्यांना लक्षात आलं असतं की देसाई काय म्हणत आहेत? २०१६ ला जो मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम झाला त्यात यासंबंधीची बोलणी झाली होती. त्यावेळी हा MoU साईन झाला होता असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

फॉक्सकॉनचे दोन प्रकल्प आले होते

देवेंद्र फडणवीस यांनी आणलेला प्रस्ताव हा तामिळनाडूत गेला आहे. फॉक्सकॉन आणि वेदांता फॉक्सकॉन या दोन प्रकल्पांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प सेमी कंडक्टर चीप साठी होता. मोबाईल फोनसाठी नव्हता. माझी उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कृपया महाराष्ट्राची दिशाभूल करू नका. फॉक्सकॉन कंपनी MoU साईन करून बसली पण त्यांनी ती जागा घेतलीच नाही. सगळीकडे एक टेबलही फिरतं आहे. काही लोकांनी यावरून होर्डिंग तयार केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in