‘राष्ट्रवादीची शिवसेना’ : ‘त्या’ संभाषणावर भास्कर जाधव अन् अजित पवार पहिल्यांदाच बोलले…
(NCP and Shivsena news in marathi) नागपूर : ‘राष्ट्रवादीची शिवसेना’ या कथित संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव यांना प्रचंड टिकेला सामोर जावं लागलं. मात्र आता यावर भास्कर जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधी पक्ष नेते अजित पवार या दोघांनीही सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय घडलं? शिवसेनेत फूट पडल्यानंतर […]
ADVERTISEMENT

(NCP and Shivsena news in marathi)
नागपूर : ‘राष्ट्रवादीची शिवसेना’ या कथित संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव यांना प्रचंड टिकेला सामोर जावं लागलं. मात्र आता यावर भास्कर जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधी पक्ष नेते अजित पवार या दोघांनीही सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय घडलं?
शिवसेनेत फूट पडल्यानंतर भाजपसह बंडखोर नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसकडे गहाण ठेवली आहे, असं म्हटलं होतं. ठाकरे गटाचे नेते हे आरोप फेटाळून लावतात. मात्र नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनादरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव यांनी हे हसत हसत मान्य केल्याचं बोललं जात आहे.
हिवाळी अधिवेशनादरम्यान एका पत्रकार परिषदेत मध्यभागी अजित पवार, त्यांच्या बाजूला डाव्या बाजूने भास्कर जाधव आणि जयंत पाटील दिसत आहेत. अजित पवारांचं बोलणं सुरु होण्यापूर्वी जयंत पाटील भास्कर जाधवांना म्हणतात, आमची शिवसेना, राष्ट्रवादीची शिवसेना, त्यावर भास्कर जाधव हसतात आणि होकार देतात. तसंच त्या वक्तव्याचा पुनरुच्चारही करतात. मनसे नेते संतोष धुरी यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.