Andheri bypolls results : सर्वात कमी मतं कुणाला मिळाली? पोटनिवडणुकीत 6 उमेदवारांचं काय झालं?

andheri election results 2022 : ऋतुजा लटकेंसह सात उमेदवारांनी अंधेरी पूर्वची निवडणूक लढवली...
andheri by election results 2022 : rutuja latke and other candidate votes
andheri by election results 2022 : rutuja latke and other candidate votes

ऋतुजा लटके अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या आमदार झाल्या आहेत. ऋतुजा लटकेंना बिनविरोध विधानसभेत पाठवण्याचं आवाहन केलं गेलं होतं. भाजपनं निवडणुकीतून माघारही घेतली, मात्र ऋतुजा लटकेंना निवडणुकीला सामोरं जावंच लागलं. कारण सहा जणांनी निवडणुकीच्या मैदानातून माघारच घेतली नव्हती. ऋतुजा लटकेंविरोधात मैदानात असलेल्या सहा उमेदवारांना मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. त्या मतदारांना किती मतं मिळाली, तेच जाणून घेऊयात...

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. पोटनिवडणुकीतून भाजपनं माघार घेतल्यानं ऋतुजा लटकेंचा विजय निश्चित मानला जात होता. अंदाजाप्रमाणे ऋतुजा लटके मोठ्या मताधिक्यानं विजयीही झाल्या. या निवडणुकीत ऋतुजा लटकेंविरोधात निवडणुक असलेल्या एकाही उमेदवाराला दोन हजारापर्यंत मतं मिळाली नाही.

ठाकरे गटावर दबाव टाकल्याचा आरोप करणाऱ्या मिलिंद कांबळेंना किती मतं मिळाली?

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मिलिंद कांबळे यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मिलिंद कांबळे यांनी आपल्यावर ठाकरे गटाने (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला होता. ही निवडणूक रद्द करण्याची मागणीली मिलिंद कांबळेंनी निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली होती. दरम्यान, निवडणूक रद्द करण्याची मागणी करणाऱ्या अपक्ष आमदार मिलिंद कांबळे यांना ६१४ मतं मिळाली आहेत. सात उमेदवारांमध्ये सर्वात कमी मतं मिलिंद कांबळे यांना मिळाली आहेत.

andheri by election results 2022 : rutuja latke and other candidate votes
ऋतुजा लटके यांच्या विजयाचे खरे शिल्पकार देवेंद्र फडणवीस! अनिल बोंडेंनी सांगितलं कारण

अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवारांना किती मतं मिळाली?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंसह एकूण सात उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ऋतुजा लटकेंचा विजय झाला, तर इतर सहा उमेदवारांना मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं.

निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या आपकी अपनी पार्टी - पीपल्स पार्टीचे बाळा व्यंकटेश नाडार यांना १,५०६ मतं मिळाली आहेत. राईट टू रिकॉल पार्टीचे मनोज नाईक यांना ८८८ मतं मिळाली आहेत.

अपक्ष उमेदवार नीना खेडेकर यांना १,५११ मतं मिळाली असून, दुसरे अपक्ष उमेदवार फरहान सय्यद यांना १,०८७ मतं मिळाली आहे. राजेश त्रिपाठी यांनीही अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. त्यांना १,५६९ मतं मिळाली आहेत.

andheri by election results 2022 : rutuja latke and other candidate votes
मशाल उजळली! भगवा फडकला! ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

अंधेरी पोटनिवडणूक : नोटा ठरला अपक्षांना भारी

अंधेरीची निवडणूक लढवणाऱ्या एकाही उमेदवाराला दोन हजार मतांचा टप्पा पार करता आला नाही. ऋतुजा लटके आणि नोटाला पडलेल्या मतांनंतर तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मतं राजेश त्रिपाठी (१,५६९)यांना मिळाली. नोटाचा पर्याय अपक्ष उमेदवारांना भारी ठरल्याचं दिसलं. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत नोटाला १२,७७९ मतं मिळाली. नोटाला पडलेल्या भरमसाट मतदानामुळे नोटाला मतदान करण्याचा प्रचार करण्यात आल्याचा दाव्याला दुजोरा मिळाल्याचं दिसतं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in