बाळासाहेबांच्या नातवानेच सुप्रीम कोर्टात मांडली एकनाथ शिंदेंची बाजू, निवडणूक आयोगातही लढणार
अनिषा माथुर, कनू सारडा/प्रतिनिधी सुप्रीम कोर्टातल्या घटनापीठाने आज निवडणूक आयोगाला शिवसेना कोणाची आणि धनुष्य बाण कुणाचा हे ठरवण्याच्या कारवाईला हिरवा कंदिल दिला आहे. उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. ठाकरे गट हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे जाऊ नये म्हणून प्रयत्न करत होते. तर शिंदे गट निवडणूक आयोगाकडे जायला हवं म्हणून प्रयत्नात होते. या […]
ADVERTISEMENT

अनिषा माथुर, कनू सारडा/प्रतिनिधी
सुप्रीम कोर्टातल्या घटनापीठाने आज निवडणूक आयोगाला शिवसेना कोणाची आणि धनुष्य बाण कुणाचा हे ठरवण्याच्या कारवाईला हिरवा कंदिल दिला आहे. उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. ठाकरे गट हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे जाऊ नये म्हणून प्रयत्न करत होते. तर शिंदे गट निवडणूक आयोगाकडे जायला हवं म्हणून प्रयत्नात होते. या सगळ्या कायदेशीर लढाईत बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाने कोर्टात एकनाथ शिंदेंची साथ दिली.
निहार ठाकरेंनी मांडली एकनाथ शिंदे यांची बाजू
बाळासाहेब ठाकरेंचे ज्येष्ठ पुत्र बिंदूमाधव ठाकरे यांचे पुत्र निहार ठाकरे हे सर्वोच्च न्यायालयात वकील आहेत. तसंच सर्वात मोठी बाब म्हणजे निहार ठाकरे हे शिंदे गटाच्या वकिलांच्या बाजूने लढत आहेत. आजच्या निर्णयानंतर निहार ठाकरे यांनी दिलेली प्रतिक्रियाही महत्त्वाची आहे. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन चालले आहेत. त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आहोत. निवडणूक आयोगातली लढाईही आम्ही जिंकू असाही विश्वास निहार ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
एकनाथ शिंदे यांना आधीपासूनच निहार ठाकरेंचा पाठिंबा
एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळे मी त्यांनाच पाठिंबा देणार असं म्हणत आधीच निहार ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे ते आज कोर्टात शिंदे गटाची बाजू मांडतानाच दिसले. तसंच यापुढेही आपण त्यांना सर्व कायदेशीर मदत करणार असंही निहार ठाकरे यांनी जाहीर केलं.