Mumbai Tak /बातम्या / Bhaskar Jadhav: “शंभर बापाची औलाद नसशील, तर…”, मोहित कंबोज- देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज
बातम्या राजकीय आखाडा

Bhaskar Jadhav: “शंभर बापाची औलाद नसशील, तर…”, मोहित कंबोज- देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज

Bhaskar Jadhav Challenge to Mohit Kamboj And Devendra Fadnavis : भाजपचे मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केलेल्या आरोपानंतर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) हल्ला चढवला. ‘जर शंभर बापाची पैदास नसेल, तर त्याने यातील एकतरी आरोप सिद्ध करून दाखवावा’, अस आव्हान जाधवांनी कंबोज यांना दिलं. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्यावरही तोफ डागली.

विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले, “कालच मी एक विधान केलं होतं की, या महाराष्ट्रातील सभ्यतेचं राजकारण, सुसंस्कृतपणाचं राजकारण, एकमेकांप्रती आदरभाव राखून राजकारण केलं पाहिजे. व्यक्तिगत कुणाच्या मुलाबाळांबद्दल, व्यक्तिगत कुणाच्या चारित्र्याबद्दल, वैयक्तिक कुणाच्या कुटुंबाबद्दल कुणीही बोलता कामा नये. मी माझ्या आयुष्यात हे तत्व पाळलं आहे.”

“जोपर्यंत माझ्यावर कुणी टीका करत नाही, तोपर्यंत मी समोरच्या माणसावर टीका करत नाही. परंतु गेले काही दिवस या महाराष्ट्राने ज्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक खूप चांगलं नेतृत्व म्हणून, एक सुसंस्कृत नेतृत्व म्हणून कैलासवासी अटलबिहार वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, विजयाराजे शिंदे असतील, अशा सुसंस्कृत पक्षात ते नेतृत्व उभं राहिलं म्हणून त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. पण, भयंकर सुडाचं राजकारण करतात”, अशा शब्दात भास्कर जाधवांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

Mohit Kamboj:”भास्कर जाधवांनी एकनाथ शिंदेंना प्रवेशासाठी 100 कॉल केले”

“त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची संस्कृती, वैचारिक बैठक ही विस्कळीत केलेली आहे. वास्तविक अशा प्रकारचे आरोप यावेळी होतात. त्यावेळी ज्यांच्यावर आरोप होतात, त्यांनी आत्मपरिक्षण केलं पाहिजे. त्यांनी थोडं मागे वळून पाहिलं पाहिजे की, माझ्याकडून कळत न कळत चुका झाल्यात का याचं आत्मपरिक्षण केलं पाहिजे. परंतु काल मी वक्तव्य इथे केलं आणि जे देवेंद्र फडणवीसचे फ्रंट मॅन म्हणून ज्यांचा उल्लेख होतो, ते मोहित कंबोज यांनी माझ्यावर आरोप केला आहे”, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला.

“त्यांनी आरोप काय केलाय की, मी 22 जूनला राज्याचे आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांच्या पक्षात घ्या म्हणून विनंत्या केल्या. त्यांनी माझ्यावर हाही आरोप केला की, एकनाथ शिंदेंबरोबर गेलेल्या 40 आमदारांना भास्कर जाधवांनी फोन केले. मला पक्षात घ्यायला सांगा असं सांगितलं. त्यांनी हाही आरोप केलाय की भास्कर जाधवांनी गुवाहाटीला जाण्यासाठी तिकीट काढणार होते. तुम्ही मला घेतलं नाही, तर मी जागा सोडणार नाही, असं मी म्हणाल्याचा आरोपही त्यांनी केला”, असं भास्कर जाधव म्हणाले.

Maharashtra Political Crisis Live : राज्यपालांकडून मोठी चूक झालेली आहे: सिंघवी

मोहित कंबोज यांना भास्कर जाधवांनी काय दिलं आव्हान?

“मी मोहित कंबोज ही व्यक्ती कधी समोर बघितलेली नाही. पण, संपूर्ण चॅनेलच्या माध्यमातून मी जाहीरपणे आव्हान देतोय की, यातील एक तरी आरोप हा मोहित कंबोजसारखा हरामखोर माणूस… तो जर शंभर बापांची पैदास असेल, तर हा आरोप सिद्ध करणार नाही आणि तो जर शंभर बापाची पैदास नसेल, तर त्याने यातील एकतरी आरोप सिद्ध करून दाखवावा”, असं आव्हान भास्कर जाधव यांनी दिलं.

“देवेंद्र फडणवीसांना माझं जाहीर आव्हान आहे की, आता सुरुवातच झाली असेल… तुमच्याकडे पैसा भरपूर आहे, तुमच्या सत्ता भरपूर आहे… तुमच्याकडे ईडी आहे. तुमच्या बाजूला एनआयए आहे, सीबीआय आहे. तुमच्या बाजूला सत्तेची मस्ती आहे. मी एक सामान्य माणूस आहे. मी तत्वाकरिता लढतो. मी ध्येयाकरिता, भूमिका घेऊन लढतो. तुमच्याकडे पोलीस खातं आहे. तुमच्या केंद्रीय यंत्रणा आहेत. अशी यंत्रणा लावा की, शंभर काय एकनाथ शिंदेंना 5 जरी फोन लावले असले, तरी माझ्या राजकीय जीवनातून मुक्त होईल”, असं आव्हान जाधव यांनी फडणवीस यांनाही दिलं आहे.

Maharashtra Budget Live: कांद्याच्या दरावरून विरोधकांनी घेरलं; शिंदे-फडणवीसांनी दिलं उत्तर

“मी मोहित कंबोजला सांगतो की, तू जर शंभर बापांची पैदास नसशील, तर हे आरोप सिद्ध करून दाखव. त्याला बोलाविता हा जो अनाजी पंत आहे, त्या अनाजी पंतांनाही सांगतो की, तुम्ही या महाराष्ट्राची संस्कृती, संस्कार संपवायला निघाला आहात. माझ्यासारखे शंभर भास्कर जाधव उभे राहतील”, असं भास्कर जाधव म्हणाले.

“शिंदेंच्या दरवाज्यात काय भास्कर जाधव उभा राहणार का?”

“माझ्या आयुष्यात काही पक्ष सोडण्याची वेळ आली, काही पक्षात जाण्याची वेळ आली. त्याच्या वेदना माझ्या मनात आहे. पण, आज सांगतो मला गर्व नाहीये. मी सामान्य माणूस आहे. मी राजकारणाकरिता कुणाच्याही दरवाजात जाऊन उभा राहिलेलो नाही. एकनाथ शिंदेंच्या दरवाज्यात काय भास्कर जाधव उभा राहणार. म्हणून मोहित कंबोजला सांगतोय की, तू जर शंभर बापांची औलाद नसशील, तर एक आरोप सिद्ध करून दाखव”, असा पुनरुच्चार जाधव यांनी केला.

भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना Rohit Sharma: धोनीची ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर parineeti chopra raghav chadha : राघवबद्दल प्रश्न विचारताच परिणीती लाजली, पुढे काय घडलं? Dalljiet Kaur : ब्लॅक सेन्शुअल ड्रेसमध्ये दलजीतचे हॉट फोटोशूट, पतीसोबत दिल्या रोमॅंटिक पोज अन्वेषी जैनच्या फिट बॉडीचं रहस्य काय? समजून घ्या काय करते दारूच्या सेवनाने ‘ही’ गोष्ट तुम्हाला कधीच मिळत नाही…: रिसर्च 4 पतींसह 11 लोकांचा जीव घेणारी लेडी सिरीयल किलर cross legs sitting: तुम्हीही असं बसता, बघा काय आहेत दुष्परिणाम? UPSC च्या तयारीसाठी नोट्स कशा असाव्यात? या सोप्या टिप्स वाचा Akanksha Dubey: आत्महत्येपूर्वी आकांक्षाचा या व्यक्तीला शेवटचा मेसेज, म्हणाली… vitamin e foods : व्हिटॅमिन ई जीवनसत्त्व मिळवण्यासाठी काय खायला हवं? Danish Alfaaz: टिकटॉक स्टार दानिश अल्फाजवर बलात्काराचा गुन्हा, नेमकं काय घडलं? Nanded: निवृत्त झाले तरीही करतात ‘ड्युटी’; पोलीस कर्मचाऱ्याच्या निशुल्क सेवेची होतेय चर्चा पुणेकरांचा प्रवास होणार सुखद! नव्या मार्गांवर धावली मेट्रो पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब! ‘या’ गोष्टींच्या किंमती ऐकून तुम्हीही म्हणाल, ‘बाप रे’ ‘तारक मेहता’साठी मिळेना दया बेन! शोधाशोध करून निर्मातेही थकले Lalu Prasad Yadav: इवली इवली बोटं, नातीला कुशीत घेतल्यानंतर असे होते लालूप्रसादाचे भाव BCCI contract list : रोहित, कोहली ते सूर्यकुमार यादव, कोणत्या खेळाडूला किती पगार? bageshwar dham sarkar: बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींविरुद्ध दुसरा गुन्हा Ameesha Patel : बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलचा बिकनीत बोल्ड अंदाज