Mumbai Tak /बातम्या / ‘पहिले तू सुधार, लोकांचं काय पाहतो’; गुलाबराव पाटलांचा चंद्रकांत खैरेंवर पलटवार
बातम्या राजकीय आखाडा

‘पहिले तू सुधार, लोकांचं काय पाहतो’; गुलाबराव पाटलांचा चंद्रकांत खैरेंवर पलटवार

मनीष जोग : जळगाव

एकनाथ शिंदे गटातील पन्नासच्या पन्नास आमदार येणाऱ्या निवडणुकीत नाही पडले तर मी हिमालयात जाईन, असं वक्तव्य शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं होतं. यावर आता शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी चंद्रकांत खैरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, तुम्ही स्वतः निवडून आले नाही. एमआयएमने तुम्हाला पाडून टाकलं. पहिलं तू सुधर, लोकांचं काय पाहतो, अशा एकेरी शब्दात उल्लेख करत चंद्रकांत खैरेंवर जोरदार पलटवार केला.

भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी गुलाबराव पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात दिवसंदिवस एकमेकांवर चिखलफेक केली जात आहे. दररोज आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झाडल्या जात आहे. एकमेकांच्या हाडवैऱ्याप्रमाणे शाब्दिक हल्ले सुरु आहेत.

दोन्ही गटात व्हिडीओ वॉर सुरु

सध्या दसरा मेळाव्यावरून दोन्ही गटात चांगलंच वाद पेटलं आहे. सध्या व्हिडीओ वॉर देखील दोघांमध्ये पाहायला मिळत आहे. एकमेकांचे जुने विधानं शेअर करून निशाणा साधला जात आहे. त्यात एकनाथ शिंदे यांनी पूर्वी भाजपवर केलेल्या टीकेचा व्हिडीओ तर उद्धव ठाकरे यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेचे व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. बाळासाहेबांचे देखील काही विधानं सोशल मीडियावर टाकून टीका केली जात आहे. तर माजी खासदार चंद्रकांत खरे हे देखील एकनाथ शिंदे गटावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. अशात कधीकाळी सहकारी असलेले गुलाबराव पाटलांनी त्यांना प्रत्युत्तर देत टीका केली आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत खैरे?

“उद्धव ठाकरेंना मुद्दाम त्रास देण्यासाठी दसरा मेळावा घेऊन मोठा खर्च केला जात आहे. बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांनी त्यांना महत्वाची खाती दिली. ज्यांनी मोठं केलं त्यांना आपण विसरायचं नसतं. जनता यांना माफ करणार नाही, त्यामुळं हे पन्नासच्या पन्नास आमदार नाही पडले ना माझं नाव बदलून ठेवा तुम्ही. पन्नासच्या पन्नास लोक नाही पडले तर मी हिमालयात जाईन. कारण हा शाप आहे जगदंबेचा. जनतेला गद्दारी आवडत नाही. आत्तापर्यंत शिवसेनेतून जेवढे निवडून गेले ते कधीही निवडून आले नाहीत” अशा शब्दांत चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.

---------
प्रियंका चोपडाने घातले ‘इतके’ महागडे शुज, किंमत एकूण धक्का बसेल राखी सावंत म्हणालेली, ‘सनी लिओनीने मुलांना बिघडवून टाकलं’ अनिल अंबानी जेव्हा मदतीसाठी निता अंबानींना म्हणाले होते, “Thank You भाभी” या घड्याळाच्या किंमतीचा तुम्ही विचारही करू शकत नाही! Chatbot ने असं काय सांगितलं की, तरुणाने थेट केली आत्महत्या?, AIचे खतरनाक रूप Sai Tamhankar Troll : ‘श्रीमंतांची उर्फी’ म्हणून सोशल मीडियावर सई झाली ट्रोल! IPL 2023 : आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळ शून्यावर बाद होणारे खेळाडू कोण? दही खाण्याचे भरपूर चमत्कारी फायदे, यापैकी तुम्हाला किती माहितीये? ‘सनी लिओनी तू भारत सोडून जा’, राखी सावंतने काय केले होते आरोप? ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रींचे परप्रांतीय जोडीदार! एका अभिनेत्यावरून तरूणींमध्ये तुफान राडा! केस ओढत लाथाबुक्या…Video व्हायरल ‘या’ 3 ड्रिंक्सने दिवसाची सुरुवात करते मलायका, सांगितलं खास गुपित इंदूरच्या मंदिरात राम नवमीलाच मृत्युचे तांडव! तो प्रसंग सांगताना माजिद फारुकींनी फोडला टाहो Bollywood : जेव्हा प्रियांका चोप्राला दिला होता स्तनांच्या शस्त्रक्रियेचा सल्ला ईशा अंबानी आणि राधिकाचे क्यूट बॉन्डिंग, इव्हेंसाठी ननंद-भावजयने कॅरी केल्या सारख्या हॅण्डबॅग! जन्मताच ‘या’ चिमुकलीची जगभर झाली चर्चा , नेमकं विशेष काय? Anushka Sharma चा पतीसोबतचा ग्लॅमरस अंदाज! मँचिंग ब्रँडेड पर्सची किंमत ऐकून व्हाल हैराण PM मोदींची नवीन संसद भवनाला सरप्राईज व्हिजीट; प्रत्येक कामाचा घेतला आढावा कोहलीने शेअर केली आपली 10 वीची मार्कशीट, मिळालेले किती टक्के? ‘मेरा दिल तेरा दिवाना…’, तरुणी अचानक रेल्वे स्टेशनवर का नाचली?