Ram Mandir : अमित शाहांच्या कृपेनेच सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली -राय
अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी एक मोठं विधान केलं आहे. राम मंदिर जन्मभूमी प्रकरणाची सुनावणी अमित शाह यांच्या आशीर्वादानेच झाली, नाहीतर सुर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली नसती, असं राय म्हणाले. अलिकडेच कर्नाटकात झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं की, ‘1 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत जाण्यासाठी आतापासूनच तिकीट […]
ADVERTISEMENT

अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी एक मोठं विधान केलं आहे. राम मंदिर जन्मभूमी प्रकरणाची सुनावणी अमित शाह यांच्या आशीर्वादानेच झाली, नाहीतर सुर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली नसती, असं राय म्हणाले.
अलिकडेच कर्नाटकात झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं की, ‘1 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत जाण्यासाठी आतापासूनच तिकीट बुक करा, कारण याच तारखेला भव्य राम मंदिराचं काम पूर्ण होणार आहे आणि रामलला त्यात विराजमान झालेले असतील.’
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट सूर्य उत्तरायण झाल्यानंतर 14 जानेवारी 2024 नंतर अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
अयोध्येतील राम मंदिर आणि मराठी माणसाचं योगदान, ऐतिहासिक निकालानंतर अयोध्येचं रूप किती पालटलं?