Thackeray Vs Thackeray: ‘याला माकडचाळे म्हणतात…’, राज ठाकरेंच्या ‘हिंदुत्वा’वर CM ठाकरे कडाडले

मुंबई तक

मुंबई: ‘कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ.. आम्ही मराठी.. मग बाकिच्यांना हाकूलन द्यायचं. मग ते फसलं तर आम्ही हिंदू.. मग बाकिच्यांना घरात बोलवायचं. हेच जे चाळे चालतात ना त्यांना माकडचाळे म्हणतात.’ असा घणाघाती टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thacekreay) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thacekreay) यांचं नाव न घेता लगावला आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: ‘कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ.. आम्ही मराठी.. मग बाकिच्यांना हाकूलन द्यायचं. मग ते फसलं तर आम्ही हिंदू.. मग बाकिच्यांना घरात बोलवायचं. हेच जे चाळे चालतात ना त्यांना माकडचाळे म्हणतात.’ असा घणाघाती टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thacekreay) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thacekreay) यांचं नाव न घेता लगावला आहे.

‘लोकसत्ता’ला या वृत्तपत्राला सोशल मीडिया लाइव्हद्वारे मुख्यमंत्र्यांनी जी मुलाखत दिली त्यात ते मनसेवर हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्द्यावरुन अक्षरश: कडाडले आहेत. काही जण ठरविक मुद्दे हाती घेतात आणि ते फसले की सोडून देतात असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर कशी टीका केली?

‘मी अशा खेळाडूंकडे लक्ष देत नाही. हे खेळाडू कोणत्या मैदानात कोणते-कोणते खेळ करतात हे आतापर्यंत लोकांनी अनुभवलेलं आहे. कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ.. तर असे हे जे खेळाडू असतात ना.. मी इतरांचा काही अपमान करु इच्छित नाही म्हणजे जे खेळ करतात डोंबारी वैगरे.. त्यांचा अपमान करु इच्छित नाही. परंतु असे खेळ महाराष्ट्राची जनता पाहत आली आहे.’

हे वाचलं का?

    follow whatsapp