Bharat Jodo Yatra : राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार?
काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्रे कुणाकडे येणार? पुढचा काँग्रेसध्यक्ष बिगर गांधी असेल की, पुन्हा गांधी घराण्याकडेच काँग्रेसची धुरा जाईल, अशा चर्चा सुरू आहेत. राहुल गांधी निवडणूक लढवू शकतात, अशीही चर्चा होतेय. यावर स्वतः राहुल गांधीनींच उत्तर दिलंय. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याबद्दल प्रश्न विचारण्यात […]
ADVERTISEMENT

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्रे कुणाकडे येणार? पुढचा काँग्रेसध्यक्ष बिगर गांधी असेल की, पुन्हा गांधी घराण्याकडेच काँग्रेसची धुरा जाईल, अशा चर्चा सुरू आहेत. राहुल गांधी निवडणूक लढवू शकतात, अशीही चर्चा होतेय. यावर स्वतः राहुल गांधीनींच उत्तर दिलंय.
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, “मी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार की नाही, हे लवकरच होणाऱ्या निवडणुकीत कळेल.”
‘तुम्ही निवडणूक लढवणार आहात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ती तुम्ही नाकारत नाही आहात’, असा प्रतिप्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले, ‘मी निर्णय घेतलेला आहे आणि मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे”, असं राहुल गांधी म्हणाले.
भारत जोडो यात्रा भाजप आणि आरएसएसच्या विचारधारेविरोधात -राहुल गांधी
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू झाली आहे. भारत जोडो यात्रेच्या तिसऱ्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) लक्ष्य केलं. भाजपची आणि आरएसएसची विचारधारा द्वेष पसरवणारी आहे. आमची ही यात्रा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या याच विचारधारेविरोधात आहे”, असं राहुल गांधी म्हणाले.