केतकी चितळे प्रकरण: सुप्रिया सुळे यांनी फडणवीस-राज ठाकरेंचे का मानले जाहीर आभार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी अभिनेत्री केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टबाबत बोलताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. त्या नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या.

अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अत्यंत विकृत अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. याच प्रकरणी केतकी चितळेला अटक झाली असून तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे. याच प्रकरणाबाबत सुप्रिया सुळे यांनाही विचारण्यात करण्यात आली.

यावेळी आपण कोण केतकी चितळे तिला ओळखतही नाही असं म्हणत अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीच्या मरणाबाबत भाष्य करण्याची संस्कृती नाही. असं म्हणत केतकी चितळे हिच्या कृतीला फारसं महत्त्व दिलेलं नाही. मात्र, यावेळी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांनी भूमिका घेतल्या त्याबाबत सुप्रिया सुळेंनी या तिघांचेही जाहीर आभार मानले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पाहा सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या:

‘एक तर मी त्यांना ओळखतही नाही. त्यांचं जे मत आहे ते त्यांच्या आणि यंत्रणेच्या बरोबरचा संवाद आहे. यावर मी काय बोलणार.’

ADVERTISEMENT

‘कुणाचाही वडिलांवर किंवा कुठल्याही व्यक्तीवर त्याने मरावं असं कोणी बोलतं? कोणत्या संस्कृतीत हे बसतं? हा संस्कृतीचा भाग आहे. मला असं वाटतं की, या निमित्ताने मी माननीय उद्धवजी, देवेंद्रजी आणि राज ठाकरे या तिघांचेही जाहीर आभार मानते.’

ADVERTISEMENT

‘अशी ही जी कृती आहे यामध्ये मराठी संस्कृती दिसते आणि यात आम्ही सगळ्यांनी मिळून सातत्य ठेवलं पाहिजे. त्यासाठी कधीही वेळ दुसऱ्या कुणावर आली तर मी स्वत: त्याच्या विरोधात उभी राहिल. कारण की, ही जी विकृती सुरु झालेली आहे ही समाजासाठी वाईट आहे.’

‘आजबाबत घडलं, उद्या ते तुमच्याबाबत घडू शकतं. अशी जी प्रवृत्ती आहे ही कुठल्याही समाजात जगामध्ये ती फार चांगली किंवा सुस्कृंत नाही.’

‘मी स्वत: भान ठेवूनच वागते. माझ्यावर ते संस्कार आहे. माझ्यावर मध्यमवर्गीय मराठी संस्कार आहेत ज्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी ज्या मराठी संस्कृतीत वागले त्यात कुणीतरी मरावं हे माझा तरी संस्कृतीत बसत नाही. माझ्या वडिलांच्या 55 वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत एवढे हल्ले झाले त्यांनी कधीही कुणाच्या विरोधात शब्द काढला नाही. ही आमची संस्कृती आहे.’ असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी केतकी चितळेला सुनावलं आहे.

केतकी चितळेला १८ मेपर्यंत राहावं लागणार पोलीस कोठडीत; न्यायालयात काय घडलं?

केतकी चितळेच्या पोस्टवर फडणवीसांनी काय दिली होती प्रतिक्रिया?

केतकी चितळेच्या पोस्टवरुन वाद पेटलेला असताना देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना असं म्हटलं होतं की, ‘कुठल्याही ज्येष्ठ नेत्याबाबत आपण कोणत्या प्रकारची भाषा वापरतो याचे भान ठेवले पाहिजे. सध्या सोशल मीडियावर खालच्या स्तरावरील भाषा वापरली जाते. खालच्या भाषेत टीका करणं सुरु आहे. पण अशाप्रकारचे शब्द कुणीही वापरू नये. या प्रकरणात कायदा त्याचे काम करेल.’ अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली होती.

दुसरीकडे राज ठाकरेंनी देखील याप्रकरणी तात्काळ एक पत्रक काढून केतकी चितळेला झापलं होतं. ‘महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरुद्ध तिनं किंवा त्या भावेनं हे लिहणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो.’ अशा शब्दात राज ठाकरेंनी केतकीला सुनावलं होतं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT