Ajit Pawar: बारामतीतल्या दिवाळी पाडव्याबाबत अजित पवारांची मोठी घोषणा, म्हणाले मी…

मुंबई तक

ADVERTISEMENT

dcm ajit pawar himself has announced that he will not attend diwali padwa in baramati know what is the reason
dcm ajit pawar himself has announced that he will not attend diwali padwa in baramati know what is the reason
social share
google news

Ajit Pawar Diwali: बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajjit Pawar) यांना डेंग्यू झाल्यामुळे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशातच आता ते बारामतीमधील दिवाळी पाडवा (Diwali Padwa) समारंभाला देखील हजर राहणार नसल्याचं आता समोर आलं आहे. स्वत: अजित पवार यांनी ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली. ज्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. (dcm ajit pawar suffer with dengue he has announced that he will not attend diwali padwa in baramati know what is the reason)

बारामतील गोविंदबागेतील पवार कुटुंबीयांचं जे निवासस्थान आहे तिथे दरवर्षी दिवाळी पाडव्याचं आयोजन केलं जातं. यानिमित्ताने शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबीय हे बारामतीकरांची भेट घेत असतात. यावेळी बारामतीचे नागरिक पवार कुटुंबीयांना भेटून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात. गेली अनेक वर्ष ही परंपरा सुरू आहे. मात्र, यंदा याच कार्यक्रमाला अजित पवार हजर राहणार नसल्याचं आता समोर आल्याने नवनव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

हे ही वाचा>> Cabinet Meeting: मंत्रिमंडळाच्या बैठकीत CM शिंदेंचे प्रचंड मोठे निर्णय, मंत्रिमंडळ निर्णय जसेच्या तसे

‘अजित पवार दिवाळीत बारामतीला जाणार नाही..’

“गेल्या काही दिवसांपासून मी डेंग्यूमुळे आजारी असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार आणि सक्तीची विश्रांती घेत आहे. आजारामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असला तरी प्रकृतीत हळुहळु सुधारणा होत आहे. पूर्णपणे बरे होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा तसेच मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. आजारपणामुळे आपल्या सर्वांपासून नाईलाजाने दूर रहावे लागणे हे त्रासदायक आहे. दरवर्षी दिवाळीत मी आपल्या सर्वांना भेटत असतो. दिवाळी पाडवा स्नेहमिलनाच्या निमित्ताने भेटीगाठी, शुभेच्छांची देवाण-घेवाण होत असते. यावर्षी पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला भेटता येणार नाही. परंतु माझ्या सदिच्छा कायम आपल्यासोबत आहेत. आपल्या सर्वांना, आपल्या कुटुंबियांना, नातेवाईक आणि मित्र परिवाराला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश, धनधान्याची समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशी प्रार्थना करतो,”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. आजारपणामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार असल्याने आणखी काही दिवस जनतेला भेटता येणार नसल्याचे सांगत त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> ‘लग्नानंतर पुरुष रोज रात्री…’, नितीश कुमारांच्या वक्तव्यावरुन गोंधळ अन् संताप

अजित पवारांचं आजारपण अन् राजकीय चर्चा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आजारपणाचा संबंध राजकारणाशी जोडला गेला आहे. पालकमंत्री पदावरून सत्ताधारी शिवसेना-भाजप आणि अजित पवार गटात वाटाघाटी सुरु होत्या. त्याच वेळी अजित पवार आजारी पडले होते. अजित पवार नाराज असल्याचं त्यावेळी म्हटलं गेलं. त्यानंतर लगेच पालकमंत्री जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता पुन्हा एकदा अजित पवारांच्या आजारपणावरून राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT