बोभाटा करुन सवंग लोकप्रियता मिळवणारे नेते ! नाव न घेता अजितदादांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मशिदीवरील भोंगे आणि आणि हनुमान चालीसेचा मुद्दा चर्चेत आणून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्याच्या राजकारणाला एक वेगळं वळण दिलं आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेते राज ठाकरेंवर वारंवार टीका करत आहेत. उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनीही आतापर्यंत अनेकदा राज यांचा भोंगे आणि हनुमान चालीसेच्या मुद्द्यावर समाचार घेतला आहे.

यानंतर सांगलीत बोलत असताना अजित पवारांनी राज यांचा उल्लेख थेट नाव न घेता बोभाटा करुन सवंग लोकप्रियता मिळवणारा नेता असा केला आहे.

संदीप देशपांडेंसाठी मैदानात उतरलेल्या राज ठाकरेंना गृहमंत्र्यांनी फटकारलं, म्हणाले…

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सांगलीच्या इस्लामपूर येथे 24 व्या राष्ट्रीय युवा व्हॉलीबॉल स्पर्धेचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते झालं. देशातील 22 राज्यातील 42 संघ आणि 900 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना अजित पवारांनी नाव न घेता राज ठाकरेंवर निशाणा साधला.

राज ठाकरे उद्धव ठाकरेंना का म्हणाले, ‘आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’

ADVERTISEMENT

“धार्मिक स्थळं ही प्रत्येक व्यक्तीची श्रद्धास्थानं असतात. वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी श्रद्धास्थानं असू शकतात आणि त्यांना तो अधिकार आहे. फक्त, काही काही लोक अतिउत्साहात श्रद्धा मोठ्या प्रमाणात दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यात एवढा बोभाटा करण्याचं कारण काय? काहींना बोभाटा करुन सवंग लोकप्रियता हवी असते. मीडियाच्या माध्यमातूनही त्यांना पब्लिसीटी मिळत जाते, असे लोक खूपच हपापलेले असतात.”

मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंनी आपल्या सभेत राज्य सरकारला अल्टीमेटम दिला होता. अजित पवारांनी आज बोलताना याचाही समाचार घेतला. “काही जण अल्टीमेटम देतात हे योग्य नाही. आज राज्याचा कारभार उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस होते, त्याच्यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी या राज्याचे नेतृत्व केलं आहे. कोणी राज्यकर्ते असले तरी त्यांना कायद्याच्या बाहेर, घटनेच्या बाहेर, संविधानाच्या बाहेर जाता येत नाही. त्यामुळे अल्टीमेटमची भाषा कोणीही करु शकत नाही. हुकूमशाही राज्य नाही, ही लोकशाही आहे”, असं अजित पवारांनी सुनावलं.

ADVERTISEMENT

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात विघ्न, आखाडा परिषदेचे अध्यक्ष काय म्हणाले?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT