शरद पवारांच्या राजीनाम्याची देवेंद्र फडणवीसांनी उडवली खिल्ली, म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

devendra fadnavis criticize ncp sharad pawara
devendra fadnavis criticize ncp sharad pawara
social share
google news

Devendra fadnavis criticize Ncp Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही आठवड्यापुर्वीच पक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर कार्यकर्ते आणि जनतेच्या भावना लक्षात घेऊन राजीनामा मागे घेण्याची घोषणा केली होती. शरद पवार यांच्या या राजीनामा नाट्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली आहे. तसेच टीआरपी कसा घ्यायचा याचे प्रशिक्षणही घ्यावे लागेल असा टोला देखील पवारांना लगावला आहे. (devendra fadnavis criticize ncp sharad pawar on resignation)

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे. मी माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो, मग माझा पक्ष माझ्या राजीनाम्यावर आक्रोश करेल, मग माझाच पक्षच ठराव करेल, मग मीच राजीनामा परत घेईन, आणि मग मीच माझ्या जागी परत येईन,अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्याची खिल्ली उडवली आहे. तसेच टीआरपी कसा घ्यायाच, त्याचे एक प्रशिक्षण घ्यावे लागेल असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना लगावला.तसेच त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं की, शरद पवार यांनी राजीनामा देतो म्हणणं आणि राजीनामा देण यातला फरक काय?,अशा शब्दात त्यांना उद्धव ठाकरेंना देखील चिमटा काढला.

हे ही वाचा : शरद पवारांनी भाकरी फिरवली! ‘या’ नेत्यांची होणार उचलबांगडी

उद्धव ठाकरेंवर टीका

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या सरकारवर जे लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते, मला वाटलं त्यांची तोंड बंद होतील,असे देवेद्र फडणवीस म्हणाले आहेत. पण काल मी सांगितलं. राजाच्या एखाद्या गोष्टीसाठी आग्रह असतो, त्यावेळी त्याची प्रजा त्याला तसे सांगत असतात.त्यामुळे राजाच्या आवडता पोपट मेला,हे जसे कोणी सांगत नाही, तसे उद्धव ठाकरेंना हे कोणी सांगत नाही, की उद्धवजी पोपट मेलाय, ते असेच सांगतात मेलाय नाही, थोडा बोलत नाही आहे, हसत नाही, डुलत नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शरद पवार यांनी 2 मे रोजी लोक माझ्या सांगाती या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात पक्ष अध्यक्ष पदावरून पायउतार होत असल्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर त्यांनी नवीन अध्यक्ष निवड़ीसाठी एक समीती गठीत केली होती. या समितीला नवीन अध्यक्षाची निवड करायची. मात्र वाय बी सेंटरमध्ये घडलेल्या या घटनेनंतर कार्यकर्ते आणि नेते भावूक झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि देशातील विऱोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांनी राजीनामा मागे घेण्याची घोषणा केली होती.

हे ही वाचा : नवनीत राणांविरोधात सुषमा अंधारे उतरणार मैदानात?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT