‘कशाला राजकीय बोलायला लावता?’, देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत चढला पारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Devendra fadnavis in maharashtra budget session : अवकाळी पावसामुळे (unseasonal rain in maharashtra) राज्यातील अनेक भागांत शेतमाल आणि फळपिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यावरून विरोधक विधानसभेत आक्रमक झाले. यावर सरकारच्या वतीने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निवेदन केलं. निवेदन करत असतानाच देवेंद्र फडणवीस आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक झाली, त्यामुळे फडणवीसांचा पारा चांगलाच वाढल्याचं पाहायला मिळालं. (Devendra Fadnavis Gets Angry after opposition leaders raised unseasonal rain issue)

कामकाज सुरू झाल्यानंतर विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकसानीचा मुद्दा मांडला.

अजित पवार विधानसभेत काय म्हणाले?

“अवकाळी पाऊस पडेल, गारपीट होईल याबद्दल हवामान विभागाने पाच दिवसांसाठी अंदाज जाहीर केले होते. कुठल्या भागात होणार याबद्दलही अंदाज वर्तवण्यात आले होते. पावसामुळे आणि गारपिटीमुळे गहू, कांदा, टोमॅटो, हरभरा, द्राक्षे, संत्रा, आंब्याचा मोहोर, मका, ज्वारी या पिकांचं नुकसान झालं आहे. मेंढ्यासह शेतकऱ्यांच्या पाळीव प्राणी मृत्यूमुखी पडले आहेत. पिकांवर झोपून शेतकरी स्वतःचं तोंड झोडून घेतोय. हातातोंडाशी आलेली पिकं गेली. सरकार तातडीने काय मदत करणार आहे? केंद्रातील पथकं तातडीने बोलवणार आहेत का?”, असे प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. त्यावर स्थगन प्रस्ताव दिलेला आहे, त्यावर निर्णय देऊन त्यावेळी बोलण्याची संधी देईन, असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Maharashtra budget Session Live: उद्धव ठाकरे आज अधिवेशनात, मविआची बैठक

त्यानंतर नाना पटोले यांनी पुन्हा एकदा या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधलं. नाना पटोले आणि छगन भुजबळ यांनी सरकार शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार का? असा सवाल करत दोन्ही नेते आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं.

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, विरोधकांवर भडकले

त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारच्या वतीने भूमिका मांडली. फडणवीस म्हणाले, “अजित पवार, छगन भुजबळ, नाना पटोले यांनी अवकाळी पावसाचा मुद्दा मांडला. शासनाने यासंदर्भातील माहिती तात्काळ मागवली आहे. एकूण 8 जिल्ह्यांत साधारणपणे 13 हजार 729 हेक्टर एवढं नुकसान झालं आहे. पालघरमध्ये विक्रमगड आणि जव्हार या भागामध्ये 760 हेक्टरवर काजू आणि आंब्याचं नुकसान आहे. नाशिक जिल्ह्यात कळवण, नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि निफाड या भागातमध्ये 2 हजार 685 हेक्टर गहू, भाजीपाला, आंबा आणि द्राक्षाचं नुकसान झालं आहे.”

ADVERTISEMENT

फडणवीस सभागृहात म्हणाले,”धुळे जिल्ह्यात साक्री, सिंदखेडा, शिरपूर 3 हजार 144 हेक्टरचं मका, गहू, हरभरा, ज्वारी, केळी, पपई याचं नुकसान झालं आहे. नंदूरबारमध्ये नंदूरबार, नवापूर, अक्कलकुवा, शहादा, तळोदा, अक्राणी येथे 1576 हेक्टरचं मका, गहू, हरभरा, ज्वारी, केळी, पपई, आंबा याचं नुकसान आहे.”

MVA: कसब्याच्या निकालाने महाविकास आघाडी मजबूत केली? भाजपचं टेन्शन वाढणार!

“जळगावमधील भुसावळ आणि धरणगाव येथे 214 हेक्टर गहू, मका, ज्वारी, केळी याचं नुकसान आहे. अहमदनगर जिल्ह्यात राहुरी, नेवासा, अकोले, कोपरगाव 4 हजार एकशे हेक्टरवरील गहू, कांदा, मका, भाजीपाला असं नुकसान आहे. बुलडाणा जिल्ह्यात नांदुरा 775 हेक्टरवरील मका, गहू, कांदा, ज्वारी, हरभरा यांचं नुकसान आहे. वाशिम जिल्ह्यातील 4 तालुक्यात 475 हेक्टरवरील गहू, हरभरा, फळपिकांचं नुकसान झालेलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी (एकनाथ शिंदे) आदेश दिले आहेत”, अशी माहिती फडणवीसांनी दिली.

फडणवीस-विरोधकांमध्ये शाब्दिक भडका, विधानसभेत काय घडलं?

दरम्यान, विरोधकांनी इतर भागात झालेल्या नुकसानाची उल्लेख केला. त्यावरू फडणवीस म्हणाले, “आता आलेली माहिती दिली आहे. अजून माहिती येणार आहे. एवढी घाई करू नका. मग आता मला बोलावं लागेल की, मागच्या काळात चक्रीवादळ आलं, त्याचे पैसे आतापर्यंत दिले नाहीत. कशाला पॉलिटिकल बोलायला लावता? कशाला राजकीय बोलायला लावता? राजकीय विषय नाहीये हा. हा विषय शेतकऱ्यांचा आहे. याच्यावर का राजकारण करता? या विषयावर राजकारण करू नका. आतापर्यंत आलेली ही सगळी माहिती आहे. मदतीसंदर्भात तात्काळ प्रस्ताव मागवले आहेत. या सगळ्या ठिकाणी तात्काळ मदत करण्यात येईल आणि उर्वरित माहिती घेऊन सगळं निवेदन केलं जाईल.”

    follow whatsapp

    ADVERTISEMENT