Mumbai Tak /बातम्या / ‘वाटेल तेवढ्या खोक्यांचा वापर करायचा अन्’, ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलं!
बातम्या राजकीय आखाडा

‘वाटेल तेवढ्या खोक्यांचा वापर करायचा अन्’, ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलं!

Saamana editorial: मुंबई: राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रचंड मोठ्या घोषणा केल्या. पण या घोषणा केवळ राज्यातील जनतेला खुश करण्यासाठी आहेत. अशी टीका विरोधकांनी केली आहे. तर दुसरीकडे शिवसेना (Shiv Sena UBT) पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या (Saamana) अग्रलेखातून फडणवीसांना डिवचण्यात आलं आहे. ( devendra fadnavis was heavily criticized by saamana editorial after presenting state budget)

‘सत्तेसाठी वाटेल तेव्हा, वाटेल तेवढय़ा ‘खोक्यां’चा वापर करायचा आणि शेतकरी व जनतेसाठी मात्र निवडणुकीच्या वर्षात तेवढा घोषणांचा सुकाळ करून जनतेला सुखाची स्वप्ने दाखवायची, असेच हे धोरण आहे.’ अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखातून अर्थसंकल्पावर टीका करतानाच फडणवीसांना देखील डिवचण्यात आलं आहे.

सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:

  • पुढच्या वर्षी अर्थात 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अपेक्षेप्रमाणे घोषणांचा पाऊस पाडला. दोन दिवसांपूर्वी राज्याच्या बहुतांश भागाला गारपीट आणि अवकाळी पावसाचा जो जबर फटका बसला, त्यापेक्षाही फडणवीसांच्या भाषणातील घोषणांचा जोर अंमळ अधिकच होता. शेतातील काढणीला आलेली उभी पिके उद्ध्वस्त करणाऱ्या गारपिटीलाही लाजवेल, अशा शब्दांचा आणि घोषणांचा पेटारा फडणवीसांनी फोडला.

  • शेतकरी काय, महिला काय, वेगवेगळे जातीसमूह व समाजासाठी नवनवीन महामंडळे काय, रस्ते काय, रेल्वे, विमानतळ, मेट्रोंसाठी निधीच्या घोषणा काय! विविध योजनांसाठी केलेल्या तरतुदी आणि मतदारांना आकर्षित करेल, अशा एक ना अनेक घोषणांचा भडीमार उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणात पाहायला मिळाला. अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारनेच विधिमंडळात मांडलेल्या आर्थिक पाहणी अहवालातून महाराष्ट्राची जी आर्थिक पीछेहाट जनतेसमोर आली, त्याचा जराही मागमूस फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात दिसला नाही. आर्थिक दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता तिसऱ्या क्रमांकावर आहे.

  • आघाडी सरकारच्या काळात 12.1 टक्के विकास दरवाढीचा अंदाज असताना तो ताज्या आर्थिक सर्वेक्षणात 6.1 टक्के म्हणजे निम्म्यावरच गृहीत धरला आहे. कृषीक्षेत्राच्या विकास दरात आणि उद्योगक्षेत्राच्या विकासातही घट दिसत असताना आर्थिक पाहणी अहवालातील निरीक्षणांची गंभीर नोंद घेऊन या क्षेत्रांच्या वाढीसाठी सरकारने कोणते संकल्प योजले आहेत त्याचे नेमके प्रतिबिंब अर्थसंकल्पात उमटणे आवश्यक होते. महाराष्ट्र सरकारवर असलेले सुमारे आणि त्याच्या व्याजात जाणारा पैसा याची तोंडमिळवणी याविषयीचे नेमके चित्र महाराष्ट्रासमोर न मांडता घोषणांचा गडगडाट तेवढा उपमुख्यमंत्र्यांनी दणक्यात केला. फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील घोषणा आणि हजारो कोटींच्या तरतुदी ऐकून ‘घेशील किती दोन्ही करांनी’ असे म्हणण्याची वेळ महाराष्ट्राच्या जनतेवर आज नक्कीच आली असेल.

  • मायबाप सरकारने सुखांची बरसात करणारी स्वप्नांची सैर घडवावी, अशी जनतेची अपेक्षा नव्हतीच मुळी. तरीही अर्थसंकल्पातून घोषणांचा नुसताच ‘गाजर हलवा’ देऊन सरकारने महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूलच केली. दुःख तेवढे दूर सारावे, एवढीच जनतेची माफक अपेक्षा आहे.

Maharashtra Budget Highlights 2023: बजेटमध्ये तुम्हाला, तुमच्या जिल्ह्याला काय मिळालं?

  • फडणवीसांनी अर्थसंकल्पात केलेल्या ‘छप्परफाड’ घोषणा पाहता महाराष्ट्राच्या जनतेवरही ‘दुबळी माझी झोळी’ असेच म्हणण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राची वास्तविक आर्थिक स्थिती जनतेच्या नजरेसमोर न येऊ देता महाराष्ट्राच्या जनतेला स्वप्नाळू दुनियेची सैर घडवणारा हा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणेच राज्याच्या तिजोरीतून वार्षिक 6 हजार रुपयांचा निधी, एक रुपयात पीक विमा, मागेल त्याला ठिबक व फळबाग योजना या व इतर काही महत्त्वपूर्ण घोषणा अर्थसंकल्पात जरूर आहेत. मात्र दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने राज्यातील एक लाख एकरवरील पिके उद्ध्वस्त होऊनही त्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याचे औदार्य अर्थमंत्री फडणवीसांनी का दाखवले नाही?

  • अर्थसंकल्पातील सतराशे साठ घोषणांपेक्षा जी तातडीची निकड होती, तीच का टाळली? कृषीक्षेत्राची प्रगती व शेतकऱ्यांचे खरोखरच कल्याण करावयाचे असेल तर इतर कुठल्याही घोषणांपेक्षा शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देणे हाच एकमेव मार्ग आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, अशी नुसतीच भाषणे झोडायची आणि शेतमालास भाव मात्र कवडीमोल द्यायचा. ताजेच उदाहरण द्यायचे तर राज्यकर्त्यांच्या याच दुटप्पी धोरणाचा जबर फटका आज राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे.

Maharashtra Budget 2023: शिंदे-फडणवीसांच्या बजेटमध्ये मराठवाड्याला काय मिळालं?

  • लागवडीचा खर्चही निघत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आत्महत्या करत आहेत. एकीकडे कांदा व हरभऱ्याची खरेदी बंद आणि दुसरीकडे अवकाळी पावसाच्या तडाख्याने शेतात ठेवलेल्या पिकांची नासाडी, अशा सुलतानी व अस्मानी संकटात शेतकऱ्यांचे मरण होत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस पाडला. पण त्यापेक्षा शेतमालाची व पिकणाऱ्या प्रत्येक दाण्याची वेळेवर खरेदी आणि किफायतशीर भाव देण्याचा शब्द अर्थसंकल्पात दिला असता तर इतर पायलीच्या पन्नास घोषणांची गरजच पडली नसती.

  • मात्र सत्तेसाठी वाटेल तेव्हा, वाटेल तेवढय़ा ‘खोक्यां’चा वापर करायचा आणि शेतकरी व जनतेसाठी मात्र निवडणुकीच्या वर्षात तेवढा घोषणांचा सुकाळ करून जनतेला सुखाची स्वप्ने दाखवायची, असेच हे धोरण आहे. गुरुवारी विधिमंडळात सादर झालेला निवडणूक अर्थसंकल्प तेच सांगतो!

बजेटनंतर अजित पवारांनी महाराष्ट्राला दिली ‘शॉक’ देणारी बातमी…

---------
मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री… एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना Rohit Sharma: धोनीची ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर parineeti chopra raghav chadha : राघवबद्दल प्रश्न विचारताच परिणीती लाजली, पुढे काय घडलं?